Latest

India and Canada issue | कॅनडातील भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणावरुन कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. (India and Canada issue)

कॅनडातील भारतविरोधी वाढत्या कारवाया आणि राजकीयदृष्ट्या प्रेरिक गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता भारताकडून ही अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. अ‍ॅडव्हायजरीच्या माध्यमातून कॅनडातील सर्व भारतीय नागरिकांना तसेच या देशात प्रवास करणार्‍यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (India and Canada issue)

तत्पूर्वी भारताच्या सध्याच्या अजेंडाला विरोध करणारा समुदाय आणि भारतीय मुत्सद्दी आणि भारतीय विभागांना कॅनडाकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे कॅनडातील अशा घटना पाहिलेल्या प्रदेशात आणि संभाव्य ठिकाणी भारतीय नागरिकांना प्रवास टाळण्याचा सल्ला रराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीमधून देण्यात आला आहे. (India and Canada issue)

संबंधित बातम्या 

काय आहे वाद?

हरदीप सिंग निज्जर (Khalistan Tiger Force chief Hardeep Singh Nijjar) याची १८ जून रोजी पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सुर्रे येथील गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे. पण भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. (India vs Canada) दरम्यान, या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या आरोपावरून कॅनडाने १८ सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. (canada expels indian diplomat) दरम्यान, त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी केली. त्यांना पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले. (canadian diplomat expelled from India)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT