Latest

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ‘या’ भारतीय युवा वेगवान गोलंदाजांना मिळाली संधी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलनंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ९ जून पासून भारत आणि द. आफ्रिकेमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होईल. या मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ आज (दि. २) दिल्लीत दाखल झाला आहे. आयपीएल २०२२ मध्ये अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामिरी केली. युवा भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा करत १५० पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर द. आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. (IND vs SA)

या युवा गोलंदाजांना मिळाली संधी

आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संधी मिळाली आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १७ सामने खेळत २४ विकेट्स पटकावल्या होत्या. या मालिकेत उमरान मलिक पहिल्यांदाचं भारतीय संघासाठी खेळताना दिसेल. उमरान मलिक बरोबरचं लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. (IND vs SA)

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे.  दरम्यान, भारतातील कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची रोज आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. (IND vs SA)

भारतीय संघ – के.एल.राहुल (कर्णधार), रूतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शगदीप सिंग, उमरान मलिक (IND vs SA)

दक्षिण आफ्रिकेचा संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन. (IND vs SA)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT