Latest

IND vs SA : आफ्रिकाविरूध्दच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा दमदार विजय; मालिकेत बरोबरी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत द. आफ्रिकेने ६ गडी गमावून भारताला विजयासाठी २७९ धावांचे आव्हान दिेले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरने केलेली शतकीपारी आणि इशान किशनने केलेल्या ९३ धावा यांच्या खेळीच्या जोरावर भारताने आफ्रिकेविरूध्द ७ गडी राखून विजय मिळवला. (IND vs SA)

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत द. आफ्रिकेने ६ गडी गमावून भारताला विजयासाठी २७९ धावांचे आव्हान दिेले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी भारताच्या डावाची सुरूवात केली. दोन्ही फलंदाजांनी डावाची सुरूवात संथ गतीने केली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात भारताचा कर्णधार शिखर धवन बाद झाला. त्याने २० चेंडूत अवघ्या धावात तंबूत परतला. शिखर धवनला आफ्रिकेचा गोलंदाज वेन पारनेलने बाद केले.

कर्णधार शिखर धवन पाठोपाठ सलामीवीर शुभमन गिल ही बाद झाला. त्याने २६ चेंडूत २८ धावा केल्या. त्याला आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाने बाद केले. यावेळी भारताची धावसंख्या ११ षटकांत ५५ धावा अशी होती. भारतीय संघाला लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर श्रेअस अय्यर आणि इशान किशन संयमी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले.

या फलंदाजांनी संयमी करत भारताचा शंभर धावांचाटप्पापार केला. तिसऱ्या विकेटसाठी इशान किशन आणि श्रेअस अय्यर यांनी १६१ धावांची भागिदारी केली आहे. २३ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ गडी गमावून १२३ धावा होत्या. यामध्ये आफ्रिकेविरूध्द संयमाने फलंदाजी करत अय्यर आणि इशान यांनी शतकी भागीदारीसह आपले वैयत्तिक अर्धशतके झळकावली. इशान किशनने ९२ च्या सरासरीने ६३ चेंडू खेळून ५८ धावा केल्या तर, श्रेयस अय्यरने ९८ च्या सरासरीने ५३ चेंडूत ५२ धावा करत भारतीय संघाचा डाव सावरला.

दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केल्यानंतर फलंदाजीचा गिअर बदलत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मैदानाच्या सर्व दिशांना फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी दीडशे धावांची भागीदारी केली. सामन्याच्या ३४ व्या षटकांत इशान किशनला रबाडाने सोडलेल्या झेलमुळे जीवनदान मिळाले.

सामन्यात फटकेबाजी करत असताना ३५ व्या षटकांत इशान किशनला ब्योर्न फॉर्च्यूनने बाद केले. इशान किशने ११० सरारसीने ८४ चेंडूत ९३ धावा केल्या. इशान किशन बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन फलंदाजीसाठी आला. इशान किशन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी सावध फलंदाजी करत एकेरी-दुहेरी धावांच्या सहाय्याने धावफलक हलता ठेवला. फलंदाज बाद झाल्यानंतर श्रेयसने संयमी फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने १०४ चेंडूत १०३ धावा केल्या.

तप्तूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या षटकांत भारताचा वेगवान गोंलंदाज मोहम्मद सिराजने क्विंटन डी कॉक बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

सामन्याच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेने दोन विकेट झटपट गमावल्‍यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत डाव सावरला. हेंड्रिक्‍सने ५८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. तर मारक्रमने ६४ चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांच्‍या शतकी भागीदारामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्‍यात कमबॅक केले.

SCROLL FOR NEXT