IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारताला दिले २७९ धावांचे आव्हान | पुढारी

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारताला दिले २७९ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत द. आफ्रिकेने ६ गडी गमावून भारताला विजयासाठी २७९ धावांचे आव्हान दिेले. (IND vs SA)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या षटकांत भारताचा वेगवान गोंलंदाज मोहम्मद सिराजने क्विंटन डी कॉक बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. (IND vs SA)

सामन्याच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेने दोन विकेट झटपट गमावल्‍यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत डाव सावरला. हेंड्रिक्‍सने ५८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. तर मारक्रमने ६४ चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांच्‍या शतकी भागीदारामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्‍यात कमबॅक केले .

मात्र भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराजने दमदार फलंदाजी करणार्‍या हेंड्रिक्‍सला तंबूत धाडले. त्‍याने ७६ चेंडूत ७४ धावा केल्‍या. त्‍याने आफ्रिकेसाठी मार्करामच्‍या साथीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्‍या ३० धावांवर खेळणार्‍या क्‍लासेनला कुलदीप यादवने मोहम्‍मद सिराजकरवी झेल बाद केले. यानंतर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या मार्करामला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मार्करमने ८९ चेंडूत ७९ धावा केल्या. त्यानंतर वेन पार्नेल आणि डेविड मिलर यांच्यात चांगली भागीदारी होत असताना पुन्हा एकदा शार्दुल ठाकुरने ही भागीदारी फोडली. त्याने पार्नेलला श्रेयस अय्यरकरवी बाद करत ही जोडी फोडली. या जोडीने ४१ धावांची भागीदारी केली.

भारताचा गोलंदाज अहमदने प्रथमच त्याने सामन्यात १० षटके पूर्ण केली, त्याशिवाय सिराजने सामन्यात चमकदार कामगिरी केली. सिराजने सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटच्या षटकात कर्णधार केशव महाराजचा त्रिफळा उडवत त्याला बाद केले. ही त्याची सामन्यातील तिसरी विकेट ठरली. संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ९ षटकात ६० धावा देत द.आफ्रिकेचा १ गडी बाद केला.

हेही वाचा; 

Back to top button