Latest

IND vs ENG T-20 : रोहित शर्मा टी-२० मालिकेसाठी सज्ज, आज येणार विलगीकरण कक्षातून बाहेर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज रोहित शर्मा विलगीकरण कक्षातून बाहेर येऊ शकतो. रोहितच्या गैरहजेरीत इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात जसप्रित बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. (IND vs ENG T-20)

बीसीसीआयकडून काही दिवसांपूर्वी टी-२० आणि वनडे मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. रोहित शर्मा इंग्लंडविरूद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने इंग्लंडविरूद्ध सुरू असणारा कसोटी सामना खेळू शकला नाही. (IND vs ENG T-20)

रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरीही अन्य खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. अशात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड टी-२० मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. (IND vs ENG T-20)

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सैमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक. (IND vs ENG T-20)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT