56 इंचाची छाती चीन आणि पाकिस्तानला घाबरली : सुब्रमण्यम स्वामींची केंद्रावर टीका | पुढारी

56 इंचाची छाती चीन आणि पाकिस्तानला घाबरली : सुब्रमण्यम स्वामींची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पुढील वर्षी जी 20 राष्ट्रांचे संमेलन जम्मू काश्मीरमध्ये घेण्याची केंद्र सरकारची योजना होती, मात्र चीन, पाकिस्तानच्या टीकेनंतर हे संमेलन दिल्लीमध्ये घेण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत आहे, असे सांगत या मुद्द्यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर टीका केली आहे. ’56 इंचाची छाती चीन आणि पाकिस्तानला घाबरली असल्याचा’ टोला स्वामी यांनी लगावला. विशेष म्हणजे जी 20 संमेलन कधी आणि कुठे घेतले जाणार, याबाबतची औपचारिक घोषणा अजूनपर्यंत सरकारने केलेली नाही.

जी 20 संमेलन जम्मू काश्मीरमध्ये घेतले जाण्याचा गवगवा झाल्यावर पाकिस्तानने सर्वप्रथम भारताला विरोध केला होता तर त्यापाठोपाठ चीनने पाकिस्तानला समर्थन दिले होते. या पार्श्वभूमीवर संमेलन श्रीनगरऐवजी दिल्लीत घेतले जाण्याची चर्चा आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा मुद्दा पकडत पंतप्रधान मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ’56 इंचाची छाती चीन आणि पाकिस्तानला घाबरली असल्याचा’ टोला स्वामी यांनी मारला. विशेष म्हणजे जी 20 संमेलन कधी आणि कुठे घेतले जाणार, याबाबतची औपचारिक घोषणा अजूनपर्यंत सरकारने केलेली नाही.

जी 20 संमेलनात अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, ब्रिटन आदी देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काश्मीरवरची आमची भूमिका स्पष्ट आहे. काश्मीरचा वाद हा जुना असून संयुक्त राष्ट्र चार्टर, सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव तसेच द्विपक्षीय चर्चेद्वारे भारत आणि पाकिस्तानने वाद सोडवणे गरजेचे असल्याचे चीनने पाकला समर्थन देताना सांगितले होते

Back to top button