Latest

कर्नाटक काँग्रेसचे पूर्व नेते गौडा यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचे छापे; मालमत्ता जप्त

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आज सकाळी (दि.२४) आयकर विभागाने येथील माजी मंत्री आणि काँग्रेसचे पूर्व नेते गंगाधर गौडा यांच्या दक्षिण कर्नाटकातील बेलथंगडी येथील शिक्षण संस्थेवर देखील आयकरच्या आयटी विभागाने छापे टाकले. छापेमारीत मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

कर्नाटकात विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, आयकर विभागाकडून माजी मंत्री आणि काँग्रेसचे पूर्व नेते गौडा यांच्यावर करण्यात आलेली कारवाई धक्कादायक आहे.

आयकर विभागाने माजी काँग्रेस नेते गंगाधर गौडा यांच्या निवास्थानी आणि शिक्षण संस्थेवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छापा टाकला आहे. या छापेमारीत आयकरच्या आयटी विभागाकडून रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

गौडा यांची राजकारणातून माघार

२०१८ मध्ये गौडा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजप सोडून गेलेल्या गौडा यांनी अलीकडेच रक्षित शिवराम यांच्याकडून काँग्रेसचे तिकीट गमावल्यानंतर राजकारणातून माघार घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आयकर विभागाने आज (दि.२४) ही छापेमारीची कारवाई केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT