Latest

Ichalkaranji : इचलकरंजी बसस्थानकाला 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर : परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

मोनिका क्षीरसागर

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
मागील दशकापासून अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या इचलकरंजी बसस्थानकाचा (Ichalkaranji) लवकरच कायापालट होणार आहे. इचलकरंजी बसस्थानकाला 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पायाभूत सुविधांसह बसस्थानकाला नवा लूक देण्याचा प्रयत्न आहे. शनिवारपर्यंत आराखडा तयार करण्याचे आदेश व्यवस्थापकांना दिले असल्याचे, पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

इचलकरंजी बसस्थानकाची (Ichalkaranji) मोठ्या प्रमाणात पडझड आणि दुरावस्था झाली आहे. किमान पायाभूत सुविधाच्या अभावामुळे प्रवाशांची मोठी हेळसांड होत होती. बसस्थानकाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी प्रवाश्यांकडून मागणी होत होती. मात्र कोरोनाच्या महामारीत याकडे दुर्लक्ष झाले होते. एस.टी. सेवा बंद झाल्यामुळे या समस्यांमध्ये भरच पडत गेली.

कोरोनाची लाट आटोक्यात आल्यानंतर एस.टी.च्या फेर्‍या नियमित सुरू झाल्या. मात्र येथील असुविधांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता इचलकरंजी आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. सातत्यपूर्ण  प्रयत्न केल्यामुळेच हे यश मिळाले. यामुळे आता इचलकरंजी (Ichalkaranji) बसस्थानकाच्या विकासकामाला गती मिळणार आहे. या बसस्थानकाच्या नवीन इमारतीसह सुशोभिकरण केले जाणार आहे. हा निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

काँक्रीटीकरण, स्वच्छतागृह, विद्युतीकरणाला प्राधान्य : पालकमंत्री सतेज पाटील 

इचलकरंजी बसस्थानकामध्ये हजारो प्रवाशांची वर्दळ असते. हे बसस्थानक विकसित होणे आवश्यक होते. बसस्थानकात अंतर्गत काँक्रीटीकरण, स्वच्छतागृहे आणि अंधारातही बसस्थानक प्रकाशझोतात उजळेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत शनिवारपर्यंत आराखडा तयार होईल, असेही सतेज पाटील म्‍हणाले.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT