Latest

T20 ICC Rankings : सूर्या-रिझवान-बाबरमध्ये टी-20 रँकिंगसाठी चुरस!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 ICC Rankings : टी 20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी (T20 World Cup 2022) आयसीसीने (ICC) क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानासाठीची लढत अतिशय रोमांचक झाली आहे. नवीन क्रमवारीत, पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानावर आहे तर सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान कायम ठेवले आहे. पण पाकिस्तानी फलंदाज रिझवान, भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम यांच्यातील गुणांचे अंतर खूपच कमी झाले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने टॉप 5 मध्ये दिमाखात एन्ट्री घेतली आहे.

डेव्हन कॉनवे टॉप 5 मध्ये…

सध्या सुरू असलेल्या टी 20 तिरंगी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कॉनवेने इंग्लंडच्या डेव्हिड मलान आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचला मागे टाकून पाचवे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंदमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत त्याने बांगलादेशविरुद्ध 70 आणि पाकिस्तानविरुद्ध 49 धावांची नाबाद खेळी केली साकारली. त्याचे सध्या 760 गुण झाले आहेत. कॉनवे आता चौथ्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्कराम (777) च्या जवळ पोहचला आहे.

रिझवान-सूर्यामधील गुणांचे अंतर कमी (T20 ICC Rankings)

रिझवानने तिरंगी मालिकेची सुरुवात 78 धावांच्या खेळीने केली. पण त्यानंतर तो फार काही करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या आणि सुर्यामधील गुणांचे अंतर केवळ पंधरा गुणांवर आले आहे. त्याच वेळी, बाबर आणि सूर्यामध्ये 30 गुणांचे अंतर आहे.

भुवी भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल (T20 ICC Rankings)

गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडच्या मार्क वुड आणि रायस टोपली यांनी क्रमवारीत झेप घेतली आहे. वुड 14 स्थानांनी 18 व्या तर टोपली 11व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार 13 व्या स्थानावर आहे. अश्विनच्या स्थानात एकाने घसरण झाली आहे. तो सध्या 22 व्या क्रमांकावर पोहचला आहे. जोश हेझलवूड, रशीद खान आणि वनिंदू हसरंगा अजूनही पहिल्या 5 मध्ये सुरुवातीचे तीन स्थान राखून आहेत.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल 5 मध्ये हार्दिक (T20 ICC Rankings)

अष्टपैलूंच्या क्रमवारीत मोहम्मद नबी, शाकिब अल हसन, मोईन अली, हसरंगा आणि हार्दिक अनुक्रमे पहिल्या पाचमध्ये आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT