Latest

IBPS Recruitment 2022 : सरकारी बँकांमध्ये अधिकारी होण्याची संधी; ७१० जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने आज १ नोव्हेंबर २०२२ पासून ibps.in या त्यांच्या वेबसाइटवर विशेष अधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी सुरू केली आहे (IBPS Recruitment 2022). सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवार यासाठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे.

देशभरातील सहभागी बँकांतर्गत कायदा अधिकारी (Law Officer (Scale I), आयटी अधिकारी (I.T. Officer (Scale-I), कृषी क्षेत्र अधिकारी (Agricultural Field Officer (Scale I), राजभाषा अधिकारी (Rajbhasha Adhikari (Scale I), एचआर/वैयक्तिक अधिकारी (HR/Personnel Officer (Scale I) आणि विपणन अधिकारी (Marketing Officer (Scale I) अशी ७१० पदे आहेत. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या बँकांचा समावेश आहे.

या परीक्षांच्या तारखा, पात्रता, अनुभव आणि ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रियाही दिली आहे. यासाठीची पूर्व परीक्षा २४ आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. यासाठी प्रवेशपत्रे डिसेंबरमध्ये दिली जातील. मुख्य परीक्षा २९ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे तर मुख्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये जाहीर होणार आहे. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा किमान २० वर्षे, तर कमाल ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. तर SC/ST/PWBD उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी रु. ८५० आहे.

IBPS Recruitment 2022 निवड प्रक्रिया

IBPS SO प्रिलिम्स परीक्षा 2022
IBPS SO मुख्य परीक्षा 2022
IBPS SO मुलाखत 2022

IBPS PO अर्ज कसा सबमिट करायचा?

  • अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला "CRP स्पेशलिस्ट ऑफिसर्स" ही लिंक मिळेल
  • "CRP- स्पेशलिस्ट ऑफिसर्स (CRP-SPL-XII) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा" या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर "CLICK HERE FOR NEW Registration" वर क्लिक करून स्वतःची नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर, फोटो चिन्ह आणि विरुद्ध हाताच्या अंगठ्याचा ठसा अपलोड करा.
  • शेवटी पेमेंट करा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT