Life Style : कडाक्याच्या थंडीत ‘ही’ मुद्रा करेल तुम्हाला उबदार! | पुढारी

Life Style : कडाक्याच्या थंडीत 'ही' मुद्रा करेल तुम्हाला उबदार!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style : शरद पौर्णिमा झाली की वातावरण हळूहळू थंड होत जाते. दिवाळी-पाडव्यापर्यंत वातावरणातील हा गारवा सुसह्य किंवा अगदी गुलाबी वाटतो. मात्र, पाडवा संपला की थंडी वाढत जाते. हळूहळू कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होते. थंडीपासून संरक्षणासाठी आपण एक ना अनेक उपाय करतो. स्वेटर जॅकेट तर घालतोच मात्र उब मिळवण्यासाठी अनेकदा शेकोटी करून बसतो. या सगळ्यांसोबत थंडी पळवण्याचा आणखी एक सोपा उपाय आहे.

आपल्या तळहातात आपल्या शरीरातील जवळपास सर्व नाड्या एकवटलेल्या असतात. तसेच पंचतत्वांनी बनलेल्या या शरीराची पाचही तत्वे आपल्या तळहातात असतात. त्यामुळे आपल्या दोन्ही हातांच्या बोटांचा उपयोग करून आपण या पंचतत्वाचे संतुलन करू शकतो. बोटांच्या या विशिष्ट रचनांना ‘मुद्रा’ असे म्हणतात. मुद्रांचे अनेक प्रकार आहेत. मुद्रा अभ्यासात आपल्याला कोणती मुद्रा कशासाठी करावी हे शिकवले जाते. मात्र, आपण आजच्या आपल्या व्यस्त Life Style मुळे हे सर्व विसरत चाललो आहोत.

तरी योग दिवसमुळे तसेच योगासनांचे होणा-या फायद्यांचे महत्व आता जगाला पटत आहे. त्यामुळे लोक पुन्हा आता योगासन आणि प्राणायाम कडे वळत आहेत. त्याचप्रमाणे जरी Life Style खूप धावपळीची झाली असली तरी प्रसार माध्यमे आणि समाजमाध्यमांमुळे लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. योगासन आणि प्राणायाम यांच्यासह मुद्रा अभ्यास केल्यास तो आपल्या आरोग्याला लाभदायक ठरतो.

Life Style : सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहे. या दिवसात प्रत्येक जण ऊब मिळवण्याचा प्रयत्न करतो. थंडी पासून संरक्षण करून उबदारपणा मिळवण्यासाठी ‘सूर्य मुद्रा’ ही प्रभावी ठरते. तसे पाहिल्यास सूर्य मुद्रेचे अन्य अनेक उपयोग आहेत. मात्र, तुम्हाला सकाळी लवकर कामावर जायचे असेल आणि थंडी खूप वाजत असेल. तर उठल्यानंतर सुखासन, पद्मासन, वज्रासन, सिद्धासनमध्ये बसून फक्त 5 ते 8 मिनिटे ही मुद्रा करा. तुम्हाला शरीरात लगेच उबदारपणा जाणवायला सुरुवात होईल. ही मुद्रा दिवसभरात 24 मिनिटे करावी. सकाळी 8 मिनिटे दुपारी 4 नंतर 8 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी 8 मिनिटे अशा पद्धतीने दिवसातून तीन वेळा विभागून 24 मिनिटे ही मुद्रा केल्यास तिचे लाभ मिळतात.

याशिवाय सूर्य मुद्रा वजन कमी करण्यात मदत करते. तसेच मधुमेह, पोटाचे आजार, विशेष करून यकृताचे आजारांवर हे प्रभावी आहे. सूर्य मुद्रा अग्नि तत्व वाढवते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊन सर्दी, कफ, निमोनिया हे आजार दूर होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर शरीर हलके झाल्याने तुम्ही एकदम सक्रिय आणि उत्साही बनता.

Life Style : ही मुद्रा कशी लावावी

तुमच्या हाताची अनामिका आणि अंगठा मिळून ही मुद्रा बनते. अनामिका म्हणजे करंगळी जवळचे बोट. अनामिका अंगठ्याच्या शेवटी लावा. त्यावर वरील बाजूच्या अंगठ्याने हलकेच दाब दिल्याने सूर्य मुद्रा तयार होते.

Life Style : अधिक व्यवस्थित जाणून घेण्यासाठी हा फोटो पाहा

हे ही वाचा :

Life Style : हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे ‘आमसूल तेल’

Life Style-Fashion Trends : धोती जंपसूट, पारंपारिक भारतीय पेहरावाचा Modern अवतार!

Back to top button