LPG Price : दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर | पुढारी

LPG Price : दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : तेल विपणन कंपन्यांनी मंगळवारी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ११५.५० रुपयांची कपात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जेच्या किमती घसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जूनपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेली ही सातवी कपात आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅसच्या वाढत्या किमतीपासून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये घट झाली आहे. आजपासून (मंगळवार) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ११५.५० रूपयांनी कमी केली. परंतु घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. ६ जुलैपासून हे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १८४४ रूपयांना मिळत होता, तो आता १६९६ रूपयांना मिळणार आहे. भारतीय तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात बदल करत असतात.

व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर

  • दिल्लीत १९ किलोच्या इंडेन एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत आता १७४४ रुपये झाली आहे, जी आधी १८५९.५ रुपये होती.
  • मुंबईत १८४४ मध्ये व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होतो, ते आता १६९६ रुपयांना मिळणार आहेत.
  • चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १८९३ रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी २००९.५० रुपये मोजावे लागत होते.
  • कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८४६ रुपये असेल, जी आधी १९९५.५० रुपये होती.

हेही वाचा :

Back to top button