Latest

मी महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान : वरूण धवन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेता वरून धवन हा त्याच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या "जुगजुग जिओ" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच पुण्यात आला होता. टेनेट मिडियाक्रोपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरूण धवन या बॉलिवूड अभिनेत्याने पत्रकारांशी मराठीमध्ये भरभरून बोलत होता. यावेळी बोलताना तो म्हणाला की "मी महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे". माझे वडील डेव्हिड धवन यांनी पुण्यातील एफटीआय मधून शिक्षण पूर्ण केले. तसेच बदलापूर या माझ्या चित्रपटाचे चित्रिकरण पुण्यातचं झाले. त्यामुळे मला पुण्याविषयी आपुलकी आहे.

वरूण म्हणाला, मी मराठी चित्रपट आवडीने बघतो. मला ते आवडतात. "जुगजुग जिओ" या चित्रपटात वडील व मुलाच्या हळुवार नात्याची गोष्ट रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जौहरचा निर्मित व या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.

कोरोनाच्या महामारीनंतर कौटुंबिक चित्रपट "जुगजुग जिओ" प्रदर्शित होत आहे. रसिकांनी तो चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा. असे आवाहन आघाडीची अभिनेत्री कियारा अडवाणीने केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT