Latest

ऋतिक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत अन् बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत ! गोव्याच्या पार्टीत चौघांची धमाल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, अभिनेत्री सबा आजाद आणि ऋतिक पत्नी सुजैन खान, अर्सलान गोनी हातात हात घालून मुंबई एअरपोर्ट स्पॉट झाले होते. यानंतर या कपलची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली होती. तर ऋतिक, सबा, सुजैन आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी चौघेजण एकत्रित एका पार्टीत स्पॉट झाले आहेत. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या इंस्टा स्टोरीवर गोवातील पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ऋतिक, सबा, सुजैन आणि अर्सलान चौघेजण एकत्रित स्पॉट झाले आहेत. यावेळी सबा पिंक रंगाच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसत होती. तर तिच्या केसांच्या कर्ली हेअरस्टाईलने ती स्टिनिंग दिसत होती. सबासोबत यावेळी ऋतिक ब्लॅक रंगाच्या टी-शर्टमध्ये हॅडसम दिसत होता.

तर दुसरीकडे ऋतिकची पत्नी सुजैन खान ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये गॉर्जियस दिसत होती. तर तिच्या बॉयफ्रेंड अर्सलान गोनी कॅज्युअल लुकमध्ये दिसला. या चौघांसोबत या पार्टीत ऋतिक आणि सुजैन याच्या कुटूबियांसोबत जायद खान, अभिषेक कपूरने हजेरी लावली आहे. या पार्टीचे आयोजन पूजा बेदीने केले आहे. सुजैन खानची बहिण फराह खानने ऋतिक रोशनसोबत फोटो पोझ दिली आहे. या सगळ्यावरून या कपलमध्ये नेमके काय चाललय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने एक्स कपल्सची गेट टुगेदर पार्टी सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसऱ्या एका युजर्सने नेमकं रिलेशनशीपमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असे म्हटले आहे.
याआधी ऋतिक रोशन-सबा आजाद आणि सुजैन खान-अर्सलान गोनी हे चौघेजण एकापाठोपाठ एक हाहात- हात घालून मुंबईच्या विमानतळावर दिसले होते. यानंतर चताहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तर सध्या हे कपल गेट टुगेदर पार्टीसाठी गोव्याला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऋतिक आणि सुजैन २०००मध्ये लग्न बंधनात अडकले होते. यानंतर २०१४ मध्ये काही वैयक्तीक कारणांनी दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना २ मुले आहेत. घटस्फोटानंतरही दोघेही आजही एकमेंकाचे ते चांगले मित्र आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT