Latest

Teleprompter : टेलिप्रोम्पटर बंद पडल्‍याने पीएम मोदी गोंधळले, ‘टेलिप्रोम्पटर’चे काम नेमके चालते कसे? जाणून घ्या

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषण शैलीने जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भाषणावर असलेल्या कमांडमुळे त्यांनी परदेशातील अनेक सभा गाजवल्या आहेत. पंतप्रधान मोदी किंवा अन्य नेते भाषणे करताना टेलिप्रोम्पटरचा वापर करत असतात. दरम्यान, पंतप्रधान मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत होते. यावेळी भाषणामध्ये पंतप्रधान मोदी बोलत असताना मध्येच थांबले. काह क्षण ते गोंधळले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, यावर सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Teleprompter : टेलिप्रोम्पटर म्हणजे काय?

वृत्तवाहिनीवरील अँकर समाेर पाहत अगदी सहज बातम्या सांगत असताना तुम्ही पाहले आहे. यावेळी तुम्हालाही प्रश्न पडतो बोलणारा व्यक्ती इतक्या सहज कसे बोलत असेल.  त्या व्यक्तीच्यासमोर टेलिप्रोम्पटर असतो. त्‍यावेळी येणारी वाक्‍य ते बोलत असते. ताे तुमच्यासमोर लिखीत स्वरुपात माहिती सादर करत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टेलिप्रोम्पटरचा लावण्यात आला होता. तो मध्येच बंद पडल्याने त्यांचा गोंधळ उडाल्याचे समोर आले. याचा वापर शक्यतो लांबलचक असलेल्या भाषणांमध्ये केला जातो. टीव्ही अँकर बातम्या सांगताना जी स्क्रिप्ट आहे ती एकवेळ वाचून येत असतो त्यामुळे आपल्या स्क्रिनवर येणारे शब्द तो अगदी सहज पद्धतीने बोलत असतो; पण अचानक टेलिप्रोम्पटर बंद पडल्यास त्याला पर्याय असणे गरजेचे असते. ते आपल्यासोबत स्क्रिप्टेड प्रिंटही घेऊन येत असतात. यामुळे अँकर किंवा मोठ्या नेत्यांना गोंधळापासून सावरता येते.

टेलिप्रोम्पटरचे काम कसे चालते?

अँकरच्या समोर क्लोजअपमध्ये एक कॅमेरा लावला जातो त्या कॅमेऱ्यामध्ये स्क्रिप्ट सेव्ह केली जाते. जसेजसे अँकर ही स्क्रिप्ट वाचत जात असतो तसतशी ती स्क्रिप्ट पुढे जात असते. यामुळे अँकरला वाचताना कोणताही अडथळा येत नाही. याचबरोबर पाहणाऱ्या व्यक्तीला वाटते की हा एगदी सहज भाषण करत आहे.दरम्यान टेलिप्राेम्‍पटरवरून थेट लाईव्ह प्रक्षेपण होत असते यावेळी अचानकटेलिप्राेम्‍पटरमध्ये गोंधळ झाल्यास समस्यांना सामोरे जावे लागते.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT