Latest

Banana Smoothie : सुट्टीत मुलांसाठी काही मिनिटांत झटपट बनवा हेल्दी बनाना स्मूदी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : परीक्षेचे टेंशन कमी झाल्याने मुलांची मौजमस्ती सुरू झाली आहे. त्यामुळे मुले घरात आहेत. त्यांना काही ना काही चटपटीत किंवा गोड खाऊ हवा असतो. मुलांना फळे दिल्यानंतर ती खाण्यास मुले नकार देतात. तर काही मुलांना ठराविक फळे आवडतात. त्यामुळे इतर दुसऱ्या फळांकडे ते निरखूनही पाहत नाही. मुलांना जबरदस्तीने काही फळे खायला दिली तर मग न खाता इतरत्र फेकून देतात. कधी- कधी घरामध्ये केळी, सफरचंद, चिकू, पपई, द्राक्षे खराब होऊन जातात. याच फळांचा छान उपयोग करता येईल. मुलांना वेगवेगळ्या आणि हटके पद्धतीच्या रेसीपीची चव चाखता आली तर काय मुलांची मज्जाच म्हणा की. म्हणून फळांपासून मस्त स्मूदी कसे बनवायचे, ते पाहुया. ( Banana Smoothie )

मुलांना बनाना प्रोटीन स्मूदी, मिक्स फ्रुट स्मूदी, चॉकलेट स्मूदी, पपई स्मूदी, अॅपल बनाना स्मूदी, हेल्दी व्हेजिटेबल स्मूदी यासारखे पदार्थ कमी वेळत बनवून द्या. त्याची स्टेट मुलांना नक्कीच आवडेल. दरम्यान, यातील खास आणि कमी साहित्यात बनवता येणारी बनाना प्रोटीन स्मूदी कशी बनवायची पाहूया.

साहित्य –

केळी – २
दूध – १ कप
मध – १ चमचा
बर्फाचे तुकडे – ४-५
प्रोटीन, व्हेनिला किंवा चॉकलेट पावडर- ३ चमचा

कृती-

१. पहिल्यांदा दोन पिकलेली केळी घेऊन त्याच्या वरचे साल काढून घ्यावे.

२. केळांचे छोटे- छोटे गोल आकारात काप करून घ्यावेत.

३. यानंतर मिक्सरच्या भांड्यात केळांचे छोटे काप, एक कप दुध, आणि एक चमचा मध घालून बारीक करून घ्यावे.

४. प्रोटीन पावडर, व्हेनिला पावडर किंवा चॉकलेट पावडर यापैकी एक कोणतीही ३ चमचे पावडर घालून हे मिश्रण एकत्रित होईपर्यत मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. (टिप- आवश्यक असल्यास यात ड्रायफूट आणि थोडे केसर घातले तरी चालते.)

५. यानंतर एका ग्लासमध्ये ओतून त्यात थंड होण्यास बर्फाचे तुकडे घालावे.

६. यानंतर डेकोरेशन करण्यासाठी स्मूदी भरलेल्या ग्लासवर केळांच्या दोन-तीन काप किंवा ड्रायफूटचे काही काप घालून सजवावे.

७. तुमची बनाना स्मूदी तयार झाली. स्वीट बनाना स्मूदी मुले नक्की खातील. ( Banana Smoothie )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT