Latest

EPFO : आता घरबसल्या जाणून घ्या पीएफ बॅलेन्स, ईपीएफओनं दिल्या ‘या’ ४ सोप्या ट्रिक्स!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी डेस्क

खासगी क्षेत्रातील कर्मचारी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPFO) गुंतवणूक करतात. कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक ठराविक रक्कम दर महिन्याला पीएम खात्यात जमा होते. पण तुम्ही कधी PF खात्यातील तुमचा बॅलेन्स चेक केला आहे का?. तुम्हाला बॅलेन्स चेक करायचा असेल तर EPFO ने घरबसल्या चार पद्धतीने बॅलेन्स चेक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

मिस्ड कॉलच्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलेन्स

EPFO ने ट्विट याची माहिती दिली आहे. EPFO कडे रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन ७७३८२९९८९९ वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवायला हवी. LAN चा अर्थ भाषा असा आहे. तुम्हाला इंग्रजीत माहिती हवी असेल तर LAN च्या जागी ENG लिहायला हवे. हिंदीत माहितीसाठी EPFO UAN HIN असे लिहायला हवे. अन्य भाषांमध्येही माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मिस्ड कॉलच्या माध्यमातून जाणून घ्या डिटेल्स

तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातून EPF बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन ०११-२२९०१४०६ वर मिस्‍ड कॉल द्यायला हवा.

वेबसाइटवरुन मिळवा माहिती

ऑनलाइन तुमचा बॅलेन्स पाहण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. या पोर्टलवर तुम्ही UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करा. यातील Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या समोर पासबुक ओपन होईल. त्यात तुम्ही बॅलेन्स पाहू शकता.

उमंग अॅपच्या माध्यमातून

जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही उमंग ॲपच्या माध्यमातून ईपीएफ बॅलेन्स चेक करु शकता. त्यासाठी उमंग ॲप ओपन करुन EPFO ‍वर क्लिक करा. त्यात Employee Centric Service वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करुन UAN पासवर्ड टाका. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. तो नमूद केल्यानंतर EPF बॅलेन्स तुम्हाला पहायला मिळेल.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT