Latest

Himesh Reshammiya B’day: इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हिमेश

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाकातून गाणारा गायक हिमेश रेशमियाविषयी (Himesh Reshammiya B'day) आपल्या सर्वांनाच माहिती आह. हिमेश प्लेबॅक सिंगर, म्युझिक डायरेक्टर, सॉन्ग रायटर, प्रोड्यूसर सोबतच अभिनेता देखील आहे. हिमेश एका खास स्टाईलमध्ये गातो. नेहमी एनर्जेटिक असणारा हिमेश आपल्या युनिक स्टाईलसाठी प्रसिध्द आहे. रिअॅलिटी सिंगिंग शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसलेल्या हिमेशचा जन्म २३ जुलै, १९७३ रोजी झाला. हिमेशने जेव्हा गाणे सुरू केले, तेव्हा त्याच्या नाकातून गाणे गाण्यामुळे बरेच ट्रोल झाले होते. मात्र हिमेशने लोकांच्या टीकेची पर्वा न करता इंडस्ट्रीत यशाचा झेंडा रोवला. हिमेश त्याच्या कर्तृत्वामुळे करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. (Himesh Reshammiya B'day)

हिमेश रेशमियाला गायक नव्हे तर अभिनेता व्हायचे होते. 'आशिक बनाया आपने', 'झलक दिखला जा' सारखी सुपरहिट गाणी गाणारा हिमेश केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गायक बनला. मुलाने मोठा गायक व्हावा, अशी हिमेशच्या वडिलांची इच्छा होती. हिमेशने संगीत उद्योगात प्रवेश केला आणि त्याचा पहिला अल्बम 'आप का सुरुर' खूप हिट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजही हा भारतीय संगीत उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक विक्री होणारा अल्बम मानला जातो.

शूटिंगसाठी ऑटो जर्मनीत नेला

हिमेशने २००७ मध्ये 'आप का सुरुर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिमेश सुरुवातीपासून काहीतरी वेगळे करतो. या चित्रपटाच्या शूटिंगची कथाही खूप रंजक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हिमेशने जर्मनीच्या रस्त्यांवर भारतीय ऑटो चालवली आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हिमेशने इंडियन ऑटोने जर्मनीला नेले. केवळ ऑटोच नव्हे तर ड्रायव्हरही भारतातून घेतले गेले. २००६-७ मध्ये या उपक्रमासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले.

सलमान खानने हिमेशला दिला ब्रेक

हिमेशने १९८८ मध्ये 'प्यार किया तो डरना क्या' मधून संगीत दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. असे म्हटले जाते की हिमेशच्या वडिलांनी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला एका चित्रपटासाठी साईन केले होते, जो काही कारणांमुळे होऊ शकला नाही. सलमाननेच हिमेशला ब्रेक दिला होता. हिमेशला २००३ मध्ये 'तेरे नाम' चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून यश मिळाले. हिमेशने १२० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत आणि ८०० हून अधिक गाणी गायली आहेत.

हिमेश करोडोंच्या मालमत्तेचा मालक

लक्झरी आणि स्टायलिश जीवन जगण्याचा शौकीन हिमेश रेशमिया हा लंडनमधील वेम्बली स्टेडियममध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय आहे. जवळपास २४ वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेला हिमेश संगीत व्हिडिओ आणि लाईव्ह शोमधून मोठी कमाई करणारा सेलिब्रिटी आहे. हिमेशच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो जवळपास ७५ कोटींचा मालक आहे. त्यांच्या ताफ्यात करोडोच्या आलिशान गाड्या आहेत. त्यांचा एचआर नावाचा म्युझिक स्टुडिओही आहे. गायनासोबतच हिमेश स्टेज शोमधूनही भरपूर कमाई करतो.

हिमेश रेशमियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, सिंगरने त्याची पहिली पत्नी कोमल रेशमियाला घटस्फोट दिला आणि सोनिया कपूरशी लग्न केले. कोमलचे लग्न १९९५ मध्ये झाले होते जे २०१७ पर्यंत टिकले. यानंतर सोनिया त्यांची जीवनसाथी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT