पुढारी ऑनलाईन: उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे येथील मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या महापूरामुळे येथील घरे, इमारतींची पडझड झाली आहे. यामध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून आजपासून पुन्हा अलर्ट (Himachal Pradesh Flood) जारी करण्यात आला आहे.
उत्तर भारतातील अविरत मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक पूर आला. परिणामी1000 हून अधिक रस्ते बंद झाले असून 5000 हून अधिक पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. अद्याप येथील मुसळधार पाऊस कमी झालेला नाही, तर IMD ने 14 जुलैपासून या भागात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला (Himachal Pradesh Flood) आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशात 24 जून पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भूस्खलन, ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे 34 जणांचा मृत्यू झाला, असे सरकारी अधिकार्यांच्या आकडेवारीत म्हटले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून 14 जुलैपासून पुढचे पाच दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला (Himachal Pradesh Flood) आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात 8 ते 12 जुलै या कालावधीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात मुसळधार पूर आणि भूस्खलन दिसून आले. त्यामुळे कुल्लू जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 20 मृतदेह सापडले असून त्यापैकी 11 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. कुल्लू येथील श्री खंड महादेव येथे सात भाविकांचे मृतदेह सापडले आहेत. अशा विविध ठिकाणांहून एकूण 20 मृतदेह सापडले आहेत. दरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये हवामान विभागाने 14 ते 18 जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हिमाचलमध्ये सापडलेल्या २० मृतदेहांपैकी 10 मृतदेह बियास नदीतून तर उर्वरित 7 भाविकांचे मृतदेह श्रीखंड यात्रेच्या मार्गावर (निर्मंड क्षेत्र) सापडले आहेत. प्रचंड थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय लंकाबेकर येथे भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखालून १ मृतदेह, पाटलीकुळात १ आणि ब्रळ परिसरात १ मृतदेह सापडला आहे.