Latest

पुलगामा येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत हिजबुलचा दहशतवादी ठार

अविनाश सुतार

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या पुलगामा जिल्ह्यात आज (दि.११) सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ठार झाला. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील खांडीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू करण्यात आली.

यादरम्यान, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला आहे. तो दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप चकमक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT