मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई | पुढारी

मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्पा तसेच मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला.
यावेळी सहा जणांना अटक करण्यासह तब्बल अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार मणिपुरी तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

स्पा सेंटरचा सहायक व्यवस्थापक जुनेल हुसेन इलास अली (32, रा. संजय पार्क, विमाननगर, लोहगाव. मूळ रा. आसाम), राय सोलोमन (26, रा. लिबर्टी सोसायटी, कोरेगाव पार्क. मूळ रा. मणिपूर), विजय पवार (22, कोरेगाव पार्क), स्टिफन खांगबा रांग (25, रा. ताडीगुत्ता चौक, मुंढवा. मूळ रा. मणिपूर), महंमद फुजेल अहमद सिराजिल हक (22, ताडीगुत्ता, मुंढवा, मूळ रा. आसाम) आणि काबूल हुसेन अमीर अली चौधरी (26, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पाऊस : मुंबईत पावसाची रिपरिप; वातावरणात गारवा

अमोल दिलीप रामगडे (मॅनेजर), स्पा सेंटरचे मालक नौशाद शेख, सुधीर पाटील, अमित प्रताप डोमले, राजू शेडगे यांचा पोलिस शोध घेत आहेत. (दि. 9) नॉर्थ मेन रोडवर लिबर्टी सोसायटीतील फेज 2 मध्ये ’गोल्डन ओक स्पा’ वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

झिरो पोलिसांचा सहभाग

गोल्डन ओक स्पामध्ये मालिश व स्पाबरोबरच लोकांना एक्स्ट्रा सर्व्हिसेस या गोंडस नावाखाली महाविद्यालयीन युवतींमार्फत वेश्या व्यवसाय करीत असल्याचे समजले होते. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरील वेबपेजवर लोकांना आकर्षित करण्यासाठी उत्तेजक लेख लिहून तो अपलोड केला होता. या छाप्यात कारवाई करण्यात आलेला गोल्डन ओक स्पा व्यवस्थापक अमोल दिलीप रामगडे हा झिरो पोलिसिंगचेदेखील काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Back to top button