पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M. Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi's 100th birthday) यांनी आज (दि.१८ जून) शंभराव्या वर्षात पदार्पण केले. आई हिराबा शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर (गुजरात) येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशिर्वाद घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हिराबेन मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. आपल्या आई बरोबरचे आजचे काही फोटोज त्यांनी ट्विट करत शेअर केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आज माझ्या आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून त्यांचे आज आशीर्वाद घेतले. त्यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले आहे की, आई, हा फक्त शब्द नाही, तर ती जीवनाची अनुभूती आहे, ज्यामध्ये प्रेम, संयम, विश्वास, खूप काही सामावलेले आहे. माझी आई हिराबा आज १८ जून रोजी शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात आपला धाकट्या मुलासोबत राहतात. वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी आपल्या आईला खास भेट देणार आहेत. गांधीनगर येथील रायसन पेट्रोल पंपाजवळील एका रस्त्याला हिराबेन यांच नाव देण्यात येणार आहे. 'हिराबेन मार्ग' असे रस्त्याचे नाव असणार आहे.
हेही वाचलंत का?