Latest

Heart Attack in Gym : ट्रेडमिलवरच हृदयविकाराचा झटका येऊन 19 वर्षीय युवकाचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Heart Attack in Gym : जिममधील ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थकुमार सिंह या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील व्यायाम शाळेत शनिवारी हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या :

हा युवक दुपारी जिममध्ये गेला होता. व्यायामशाळेत अन्य मुलेही होती. ट्रेडमिलवर व्यायाम करत असतानाच अचानक त्याला चक्कर आली. याही परिस्थितीत त्याने ट्रेडमिलचा वेग कमी केला. त्यानंतर तो खाली कोसळला. जिममधील अन्य तरुणांनी त्वरित त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळावरच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. (Heart Attack in Gym)

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला तरुण त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. तो नोएडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. गाझियाबाद येथील खोडा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरस्वती विहार येथील रहिवासी होता.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे या युवकाने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. तो कोसळण्यापूर्वी व्यायाम करताना थांबल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो अचानक कोसळला. त्याला कोसळलेले पाहून जिममध्ये व्यायाम करणारे अन्य दोघांनी त्याच्या ट्रेडमिलजवळ धाव घेतली.

Heart Attack in Gym : आईसोबतचे ते बोलणे ठरले शेवटचे

सिद्धार्थच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या 10 मिनिटे आधीच तो त्याच्या आईसोबत फोनवर बोलला होता. नंतर तो जिममध्ये परतला होता. मात्र नंतर अवघ्या 10 मिनिटांनी ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना सिद्धार्थ खाली कोसळला.

Heart Attack in Gym : रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

जिममध्ये हृदयविकाराने कोसळल्यानंतर त्याला जिममधील अन्य व्यक्तींनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तपासणी नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा त्रास झाल्याचे दिसून आले.

Heart Attack in Gym : घटनेमुळे जीममधील व्यायामावर पु्न्हा प्रश्नचिन्ह

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. सोबतच जिममधील व्यायामाबाबत चिंता व्यक्त केली गेली. याशिवाय जीममधील व्यायाम आणि दिनचर्ये दरम्यान सुरक्षा उपायांच्या महत्वाबद्दल चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

Heart Attack in Gym : यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत

जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी दोघांचाही जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला आहे.

दोघांनाही जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. दोघांनाही वाचवण्याचे डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र, सिद्धांतला वाचवणे शक्य झाले नाही. तर राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दोन वेळा सीपीआर देण्यात आला. काही काळ ते रुग्णालयात दाखल होते. मात्र, नंतर त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT