

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली येथील रोहिणी जिल्ह्यातील केएन काटजू मार्ग परिसरात जिममध्ये एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ट्रेड मिलवर व्यायाम करताना शॉक बसल्याने बीटेक इंजीनियर तरुणाचा मृत्यू झाला. सक्षम कुमार (वय २४) असे तरुणाचे नाव आहे. तो ट्रेड मिलवर धावताना खाली उतरून तो दोन ट्रेडमिलच्या मध्ये बसला. यावेळी त्याला जोरदार करंट बसला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळी जाऊन पोलिसांनी जिमचा मालक अनुभव दुग्गलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका ट्रेडमिलमध्ये करंट उतरले होते. त्याला स्पर्श होताच तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, , सक्षम आपल्या परिवारासोबत दिव्य ज्योती अपार्टमेंट, सेक्टर-१९, रोहिणी येथे राहतो. त्याच्या कुटुंबात वडील मुकेश कुमार, आई आणि एक छोटी बहीण आहे.
मुकेश कुमार यांची बादली परिसरात ब्रेड बनवण्याची फॅक्टरी आहे. सक्षमने बीटेक केल्यानंतर एका मल्टी नॅशनल कंपनीत इंजिनियरची नोकरी करत होता. रोज सकाळी तो सेक्टर-१५ येथे एका जिममध्ये व्यायाम करायला जायचा. मंगळवारी सकाळी तो घरातून जिमला गेला. जवळपास सात वाजण्याच्या दरम्यान, ट्रेडमिलवर पळताना दोन ट्रेडमिलच्यामध्ये बसला. त्यावेळी त्याला करंट लागला.