Latest

‘गोकुळ’च्या लेखापरीक्षण निर्णयावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया : म्हणाले, “त्यांच्या गटाचे संचालक…”

मोहन कारंडे

कागल; पुढारी वृत्तसेवा : गोकुळ दूध संघाचे विशेष लेखापरीक्षण होणार असल्याबाबतच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचे संचालक असतानाही गोकुळचे विशेष लेखापरीक्षण लागत आहे, या निर्णयाचे स्वागत असल्‍याचे त्यांनी म्हटलं आहे.

गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघाचे विशेष लेखापरीक्षण होणार असल्याचे सांगितले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीवेळी दूध दरात दोन रुपयांची दरवाढ करू, अशी आम्ही घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात ही दरवाढ आठ रुपये करण्यात आली. प्रतिलिटरला चौपट दरवाढ देण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून अतिशय काटकसरीने आणि पारदर्शी कारभार सुरू आहे.

… तरीही गोकुळचे विशेष लेखापरीक्षण लागत आहे

गोकुळ मधील उपपदार्थांमध्ये फायदा होत नव्हता, सध्या मात्र कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. खर्चावर सर्व बाजूंनी मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. पारदर्शी आणि काटकसरीमुळे संघ फायद्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवाय खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचे संचालक गोकुळमध्ये असतानाही गोकुळचे विशेष लेखापरीक्षण लागत आहे, अशा शब्दात मुश्रीफ यांनी या निर्णयावर आश्‍चर्यही व्यक्त केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT