

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौर्यावर येत आहेत. नरेंद्र मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही सर्वजण स्वागतच करतो. भाजपमध्ये पूर्वी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुष्मा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची फळी होती. आता मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा एकही पर्याय नाही. त्यामुळे मोदींना सरपंचांपासून पंतप्रधान पदापर्यंतच्या सर्वच निवडणुकीसाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे त्यांची काळजी वाटते ,अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे यांनी समाविष्ट गावांमधील विविध प्रश्नांसाठी गुरुवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौर्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात बोलताना खा. सुळे यांनी प्रत्येक निवडणुकीसाठी भाजपकडे मोदींशिवाय पर्याय नसल्याची टीका केली. तसेच शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे नाव नसणे हे दुदैवी असल्याचेही मत व्यक्त केले.
राज्यातील ईडी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फायद्यासाठी लांबवत आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक नसल्याने नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनीधी नसल्याने खालची यंत्रणा काम करत नाही. लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, राज्यकर्ते सत्तेचे केंद्रीकरण करत आहेत. सर्व सत्ता आपल्या हातात ठेवत आहेत. एका मंत्र्याकडे सहा सहा खाती आहेत, असेही खा. सुळे म्हणाल्या. पार्थ पवार आणि संभूराज देसाई यांच्या भेटीवरून गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. यावर बोलताना सुळे यांनी आमच्या घराचे नाव घेतले तर बातमी होते, असे म्हणत जास्त बोलणे टाळले.
– आमदार जास्त असूनही भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतले, ज्यांच्यावर केसेस होत्या त्यांना क्लीन चिट दिली. सत्तेसाठी भाजपने जो त्याग केला आणि जी सहनशीलता दाखवली, त्याचे कौतुकच करायला हवे.
– कसबा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्रीत बसुन निर्णय घेतील.
– बारामती व आमच्यावर अथिती देवो भवचे संस्कार आहेत, त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत.
– मागील तीन वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग आले. मात्र, चार महिन्यात पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली.
– जी 20 परिषद पुण्यात झाली, ती कशासाठी होती, या परिषदेचा पुण्याला काय फायदा झाला, हे काहीच माहिती नाही.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्यातील जे फोटो पाहिले, त्यामध्ये हैद्राबादचे उद्योगपती दिसले. ते लोक हैद्राबादला राहतात, मुंबई येऊन ते सह्या करून गेले असते. मग दावोसला जाण्याची गरज काय.
– खासदार ब्रीजभूषण सिंग यांच्यावरील आरोपाचे प्रकरण नाजुक आहे, अशा प्रकारणावर माहिती घेऊन बोलणे योग्य