Latest

HBD Salman : गॅलॅक्सी अपार्टमेंट ते पनवेल फार्महाऊस; सलमानचं घर आतून दिसतं तरी कसं?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान म्हणजे, अभिनेता सलमान खानला कोण ओळखत नाही. त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. त्याचे देशात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहे. सलमानने (HBD Salman) एकापेक्षा एक हिट चित्रपटात अभिनयाची जादू पदड्यावर साकारली आहे. सलमानचे आगामी 'किसी का भाई किसी की जान', 'पठाण', 'टायगर ३', 'वेड' हे चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. काही वेळा सलमान ब्रेक घेऊन पनवेलच्या फार्म हाऊसवर राहण्यास जातो. या पनवेलच्या फार्म हाऊसबद्दल तुम्हाला माहिती आहे का? (HBD Salman)

सलमान खानचा एखाद्या सणासुदीसारखा वाढदिवस साजरा होणार आहे. हा वाढदिवस कदाचित त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर जोरदार पार्टी होण्याची शक्यता आहे. सलमानने या फार्महाऊसला बहिण अर्पिताचे नाव दिले आहे. हे फार्म हाऊस मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेलच्या घनदाट जंगालाच्या मध्यभागी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता फार्महाऊस जवळपास १५० एकरात उभारले आहे. यात ३ बंगले, जिम, सुंदर स्विमिंग पूल, पाच घोडे, अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत. तर या फार्महाऊसची किंमत ८० कोटी रूपयांवर असल्याची माहिती जवळच्या सूत्रांनी दिली आहे. याच ठिकाणी कोरोनाच्या काळात सलमान त्याच्या कुटुंबियांसोबत राहिला होता. काही कारणास्तव या फार्महाऊसवर सलमान त्याच्या मित्रासोबत बऱ्याच वेळा स्पॉटदेखील झाला आहे.

सलमानच्या इन्स्टाग्रामवर कोरोनाच्या काळातील शेती करताना याच फार्महाऊसवर दिसला होता. तर तो घोडे स्वारीदेखील येथेच करत असतो. कधी-कधी तो त्याच्या घोड्यांना पनवेलमध्ये येऊन चारा- पाणी खाऊ घालत असतो. पनवेलच्या या बंगल्याचे काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत.

कोटींची संपत्ती पण, 1 BHK अपार्टमेंटमध्ये राहतो सलमान

पनवेल फार्म हाऊसमध्ये खूप सुंदर लोकेशन्स आहेत. परंतु, स्विमिंग पुलाजवळील बुद्धाची एक मोठी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. सलमान खान बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आई सलमा आणि वडील सलीम खानसोबत राहतो.

सोफ्यावर झोपतो सलमान, चालवत नाही AC

सलमान एक मोठा स्टार आहे. जगभरात त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. वर्षाची कमाई आणि संपत्तीदेखील हजार कोटी रुपयांमध्ये आहे. सलमानचा उल्लेख करत एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले होते, सलमान नेहमी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जातो. सलमान नेहमी सोफ्यावर झोपलेला दिसतो. तो एसी सुरु करून झोपत नाही. सलमान एकदम सामान्य जीवन जगतो.

सलमानचे गॅलेक्सी अपार्टमेंट मुंबईतील बांद्रा येथे आहे. एक हाय पॉश परिसरात तो राहतो. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपार्टमेंट पाहिल्यानंतर कुणालाही वाटणार नाही की, या अपार्टमेंटमध्ये सलमानचा वन बीएच के फ्लॅट आहे. अन्य स्टार्स प्रमाणे आलीशान घर नाही. सलमानने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत महटलं होतं, 'या घरात माझ्या खूप आठवणी आहेत. मी येथे बिल्डिंगच्या इतर मुलांसोबत खेळायचो. माझं बालपण येथे गेलं आहे. मस्ती करत होतो. कभी मित्र माझ्या घरी जेवायचे तर कधी मी मित्रांच्या घरी जेवायचो.'

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर सलमान राहतो. पहिल्या मजल्यावर त्याचे आई-वडील राहतात. अपार्टमेंटमध्ये डायनिंग आणि लिव्हिंग एरिया एल शेपमध्ये आहे. आणि यामध्ये ओपन किचन आहे. एक मोठं बेडरूम आहे. ज्यासोबत बाथरूम ॲटॅच आहे. सलमान खानच्या या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत किती आहे, याची कोणतीही माहिती नाही. परंतु, रिपोर्ट्सनुसार, या इमारतीची किंमत आता १०० कोटींच्या आसपास आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT