घोडेगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदा कांदा उत्पादकांची मोठी निराशा झाली. सुरुवातीपासूनच बाजाराभव पडल्याचे दिसले. मध्यंतरी चार-दोन दिवस भावात थोडीफार वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना पण ज्यांच्याकडे कांदा होता, त्या शेतकर्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काल पुन्हा आवक वाढल्याने बाजारभाव दोनशे रुपयांनी खाली उतरल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे शेतकर्यांनी जड पावलानेच बाजार समिती सोडल्याचे दिसले.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपआवारात काल सोमवारी 38 हजार 209 गोण्या कांद्याची आवक झाली. लिलावासाठी 206 ट्रक कांदा आवक झाली. यात 30 हजार 565 गोणी उन्हाळी जुना कांदा होता. 7644 गोणी लाल कांदा विक्रीसाठी आला होता. यामध्ये जुना उन्हाळी कांद्यास 200 रुपयांपासून 2050 रुपयांपर्यंत दर मिळाला. लाल कांद्यास 800 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत दर मिळाला. कांदा मार्केटमध्ये आवक वाढत आहे. नवीन लाल कांदा आवक सुरू झाली असून, पुढील 15 दिवसांत आवक आणखी वाढेल, असे व्यापारी सांगत आहेत. गेल्या लिलावाच्या तुलनेत क्विंटलमागे 200 रुपयांनी घसरण झाली.
लिलावातील भाव उन्हाळ गावरान कांदा
2400 ते 2500
मोठा कलर पत्तिवाला
1900 ते 2050
मुक्कल भारी ः1000 ते 1800
गोल्टा ः 700- ते 900.
गोल्टी ः 300 ते 700
जोड ः 300 ते 400
हलका डॅमेज कांदा-
200 ते 300