Latest

HBD Priyanka Chopra : छोट्या गावातील मुलगी ते हॉलिवूडची हिरोईन कशी झाली प्रियांका?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (HBD Priyanka Chopra) बॉलिवूडची यशस्‍वी अभिनेत्रीच नाही तर तिने हॉलिवूडमध्येही आपला डंका वाडवला आहे. चित्रपट इंडस्‍ट्रीत तिने स्‍वत:ची एक प्रतिमा निर्माण केली. तिचा आज ३९ वा वाढदिवस आहे. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील प्रियांका हॉलिवूडपर्यंत कसी पोहोचली. तिचा थक्क करणारा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायलाचं हवा. (HBD Priyanka Chopra)

छोट्‍या गावातील मुलगी

प्रियांकाचा जन्म १८ जुलै, १९८२ ला झारखंडच्‍या जमशेदपूरमध्‍ये झाला. प्रियांकाने छोट्‍या गावातून मायानगरीत झेप घेतली. ती २००० मध्‍ये तिने मिस वर्ल्ड बनली. मॉडेल म्‍हणून प्रियांकानेही काम केलं होतं. खूप लोकांना माहिती आहे की, मिस वर्ल्ड होण्‍यापूर्वी प्रियांकाने एका राजकीय व्‍यक्‍तीच्‍या आयुष्‍यावर आधारित बायोपिकमध्‍ये काम केलं होतं.

प्रियांकाला सर्वांत आधी एक चित्रपट मिळाला होता तो म्‍हणजे 'गुड नाईट प्रिंसेज'. हा चित्रपट एटली बरार यांनी दिग्‍दर्शित केला होता. २००० मध्‍ये प्रियांकाला हा चित्रपट मिळाला. आणि त्‍याचवर्षी तिला मिस वर्ल्डने सन्‍मानित करण्‍यात आलं. प्रियांकाने मिस वर्ल्ड स्‍पर्धेत जाण्‍याकरिता एका महिन्‍यात शूटिंग पूर्ण केलं होतं. हा चित्रपट प्रियंका गांधी यांच्‍या जीवनावर आधारित होता. प्रियंका गांधी त्‍यावेळी २८ वर्षांच्‍या होत्‍या. हा चित्रपट हिंदी आणि इंग्‍लिश दोन्‍ही भाषेत तयार होत होता. प्रियांका चोप्रासोबत चित्रपटात पूजा बत्रा आणि राहुल देव होते. परंतु, हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही.

१३ वर्षांची असताना प्रियांका तिच्‍या काकीसोबत अमेरिकेत राहत होती. तेथे ती शिक्षणासाठी तीन वर्षे राहिली. अमेरिकेतील शाळेत तिला वर्णभेदालाही सामोरे जावं लागलं होतं. नंतर ती भारतात परतली. तिने बरेलीच्‍या आर्मी पब्लिक स्कूलमध्‍ये शिक्षण घेतलं.

प्रियांकाचा पहिला चित्रपट २००२ मध्‍ये आलेला तमिळ चित्रपट 'तमिझन' आणि पहिला हिंदी चित्रपट २००३ मध्‍ये आलेला 'द हीरो : लव स्टोरी ऑफ अ स्पाय' होता. नंतर महिन्‍याभरातच प्रियांकाचा 'अंदाज' चित्रपट आला. प्रियांकाची अंदाजमधील भूमिका लक्षात राहण्‍यासारखी होती.

यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले. 'तमिझन' (२००२), 'अंदाज' (२००३), 'द हीरो' (२००३), 'मिस इंडिया : द मिस्ट्री' (२००३), 'प्लॅन' (२००४), 'असंभव' (२००४), 'एतराज' (२००४), 'मुझसे शादी करोगी' (२००४), 'किस्मत' (२००४), 'ब्लफ मास्टर' (२००५), 'बरसात' (२००५), 'यकीन' (२००५), 'वक्त' (२००५), 'आप की खातिर' (२००६), 'डॉन' (२००६), 'क्रिश' (२००६), '३६ चायना टाऊन' (२००६), 'सलाम-ए-इश्क' (२००७), 'किस्मत टॉकीज' (२००७), 'बिग ब्रदर', (२००७), 'कुबार्नी' (२००७), 'लंडन ड्रिम्स' (२००७), 'गॉड तुस्सी ग्रेट हो' (२००८), 'फॅशन' (२००८), 'वॉट्स युअर राशी?' (२००८), 'सात खून माफ' (२०११), 'बर्फी' (२०१२), 'मेरी कोम' (२०१४), 'दिल धडडकने दो' (२०१५), 'बाजीराव मस्तानी' (२०१५) यासारख्‍या चित्रपटात प्रियांका चोप्राने काम केलं आहे.

हॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री

बॉलिवूडबरोबरच प्रियांकाने हॉलिवूडमध्‍येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आगामी 'इजन्ट इट रोमँटिक' या हॉलिवूडपटात या चित्रपटात हॉलिवूड स्टार लियाम हेम्सवर्थबरोबर झळकणार आहे. प्रियांकाचा तिसरा हॉलिवूडपट आहे. यापूर्वी तिने 'बेवॉच' आणि 'अ किड लाईक जेक' या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 'क्वाँटिको' ही टीव्ही मालिकेसाठी तिने काम केलयं.

मिस वर्ल्ड स्पर्धेत चुकीचं दिलं होतं उत्तर, तरीही…

सन २००० मध्ये ३० नोव्हेंबर हा दिवस प्रियांकासाठी सोनेरीदिवस होता. भारताची कन्या प्रियांका चोप्राने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी जगातील सर्वात सुंदर होण्याचा मान पटकावला होता. लंडनमधील मिलेनियम डोम येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रियांका चोप्राला एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण, तिने चुकीचे उत्तर देऊनही तिला हा मुकूट आपल्या नावे करता आला होता. तिला विचारण्यात आले होते की, ती जगातील कोणत्या सर्वात यशस्वी जिवंत महिलेला आदर्श मानते? या प्रश्नावर प्रियांका चोप्रा म्हणाली की-मदर तेरेसा. तिच्या या उत्तरानंतर संपूर्ण सभागृहात बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट झाला होता. प्रियांकाच्या या उत्तराने उपस्थित प्रेक्षकांसोबतच जजेसचीही मने जिंकली होती.

ती म्हणाली होती की, जगात जरी अनेक लोक आहेत. पण सर्वात जास्त प्रभावित मी मदर तेरेसा यांच्यामुळे झाली आहे, मला ती माझ्या मनापासून हवी आहे. त्यांनी भारतातील लोकांसाठी जे काम केले, ते संपूर्ण आयुष्य त्यांनी इतरांच्या सेवेत घालवले. पण, तिच्या उत्तरात एख चूक होता. तिला यशस्वी जीवंत महिलेविषयी विचारण्यात आले होते. पण, तिने दिवंगत मदर तेरेसा यंचं नाव घेतलं होतं. ती जिंकल्यानंतर अनेक परदेशी प्रसरमाध्यमांशी प्रियांकाविषयी प्रश्न उपस्थित केले होते.

आज प्रियांकाने हॉलिवूडमध्येही आपले स्थान बळकट केले आहे. ती रिअल लाईफमध्ये एका मुलीची आई आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT