पिंपरी : माझ्या मुलाला शिव्या देऊ नका असे म्हणणार्या फिर्यादी महिलेस आरोपी महिला व तिच्या मुलांनी मारहाण केली. यात फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला. ही घटना थेरगावातील मोरेश्वर कॉलनीमध्ये मंगळवारी (12 रोजी) रात्री नऊ वाजता घडली.
फिर्यादीच्या शेजारी आरोपी व त्यांची मुले अमित शिंदे, अक्षय शिंदे राहतात. फिर्यादीच्या मुलाने अमितला शिव्या दिल्या, असे सांगत अमितने फिर्यादीच्या मुलाला शिव्या देण्यास सुरुवात केली. म्हणून विरोध केला, तर आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली.