Latest

HBD Govinda : गोविंदाच्या चार महिन्याच्या बाळाचा झालेला मृत्यू, वाचा त्याच्या आयुष्यातील किस्से

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोविंद अरुण आहुजा उर्फ ​​गोविंदा ५९ वर्षांचा झाला आहे. साठी गाठत असलेल्या या अभिनेत्याला आजही चाहते तरुण मानतात. कारण गोविंदाचा अभिनय, डायलॉग्ज आणि डान्स स्टाईल सर्वकाही एव्हरग्रीन आहे. (HBD Govinda) २१ डिसेंबर, १९६३ रोजी मुंबईत जन्मलेल्या गोविंदाने पडद्यावर लोकांना खूप हसवले आणि खूप रडवलेही. मात्र, गोविंदाच्या खऱ्या आयुष्यातील अनेक गोष्टी बहुतेकांना माहित नसाव्यात. इतरांप्रमाणेच गोविंदानेही आपल्या आयुष्यात अनेक संकटं आणि दु:ख झेलली आहेत. (HBD Govinda)

HBD Govinda
HBD Govinda

टीना (नर्मदा) ही गोविंदाची मोठी मुलगी आहे. पण, कदाचित फार कमी लोकांना माहित असावी की, तिच्या मोठ्या मुलीचा ४ महिन्यांची असताना मृत्यू झाला होता. याबाबतचा खुलासा खुद्द गोविंदाने केला होता.

HBD Govinda

गोविंदाने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आयुष्यातील या भावनिक क्षणाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, "मी माझ्या कुटुंबात अकरा मृत्यू पाहिले आहेत. त्यापैकी एक माझ्या पहिल्या मुलीचा मृत्यू आहे, तिचे वय चार महिने होते. वडील, आई, दोन चुलते, भावंडे, भावजय आणि बहीण यांचा मृत्यू मी पाहिला आहे. मी या सर्व मुलांचे संगोपन केले आहे. कारण त्यांच्या कंपन्या बंद पडल्या होत्या आणि त्यांच्याकडे काम नव्हते. खूप भावनिक आणि आर्थिक दबावात सर्वजण होते."

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा

आईचे भाकीत खरे ठरले

गोविंदाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. गोविंदा म्हणाला होता की, "मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईने सांगितले होते की, वयाच्या २१ व्या वर्षी मी अप्रतिम काम करेन आणि या वयात माझा पहिला चित्रपट आला. पन्नास दिवसांनी मी ४९ चित्रपट साईन केले."

गोविंदाच्या आईने तिच्या मुलीच्या आणि तिच्या स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली. गोविंदाने सांगितले होते की, "माझी आई जेव्हा कार्यक्रमाला जायची तेव्हा आमची देखभाल पद्मा जीजी (कृष्णा अभिषेकची आई) करत असत. एके दिवशी आई म्हणाली की, पद्मा जीजी मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू होईल. नंतर तिचा मृत्यू झाला. इतकेच नाही, एके दिवशी आईने स्वतःच्या मृत्यूचे भाकीत केले आणि तीन महिन्यांनी ती मरण पावली." जेव्हा गोविंदाच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा तो 'हीरो नंबर वन' या चित्रपटाचे शूटिंग करत होता.

…तर आज गोविंदाला तीन मुले असती

गोविंदाने १९८७ मध्ये सुनीतासोबत लग्न केले होते. पहिल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यांना आणखी दोन मुले झाली. मुलगी नर्मदा, जिने चित्रपटासाठी तिचे नाव बदलून टीना आहुजा केले. मात्र, तिचा पहिला चित्रपट 'सेकंड हँड हसबंड' म्हणावा तसा चालला नाही. गोविंदाच्या मुलाचे नाव यशवर्धन आहुजा असे आहे.

SCROLL FOR NEXT