बुलढाणा : धावत्‍या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणार्‍या मातेवर काळाचा घाला | पुढारी

बुलढाणा : धावत्‍या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणार्‍या मातेवर काळाचा घाला

बुलढाणा ; पुढारी वृत्‍तसेवा दुचाकीवरील प्रवासात दोन वर्षांच्या चिमुरडीला दूध पाजताना तोल जाऊन खाली पडल्याने मातेचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खामगांव-अकोला महामार्गावरील कोलोरी गावाजवळ मंगळवारी (दि. २१) सायंकाळी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अकोला शहरातील चौरे प्लाट भागातील रहिवासी आबाराव देशमुख हे पत्नी शितल (वय २७) व  चिमुकली रियांशीसह दुचाकीने खामगावहून अकोल्याकडे परतत होते. प्रवासावेळी रियांशा रडून आकांत करु लागली. तिला दूध पाजण्‍यासाठी आई शितलने जवळ घेतले. या वेळी अचानक तोल गेल्याने चिमुकलीसह शीतल या धावत्या दुचाकीवरून खाली पडल्‍या. त्‍यांच्‍या डोक्याला गंभीर इजा झाली. त्‍यांना तत्‍काळ खामगावच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्घटनेत रियांशी सूदैवाने बचावली. जखमी झालेल्या रियांशीला खामगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

भूकेने रडणाऱ्या मुलीला शांत करण्यासाठी मातेने दूध पाजताना घडलेल्‍या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. दरम्‍यान, शितल यांच्‍या आकस्‍मिक निधनामुळे  नातेवाईकांनी केलेल्‍या आक्रोश उपस्‍थितांचे हद्य पिळवटून टाकणारा ठरला.

हेही वाचा : 

Back to top button