पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सात म्हणा सात, सात म्हणा सात बाहुलीला खायला द्या दही नी भात..' असाे बडबड गीत असो की 'छोटी माझी बाहुली तिची मोठी सावली घारे डोळ फिरवीते लुकूलुकू; ही कविता असाे. चिमुकलीची पहिली मैत्रीण असते ती बाहुलीच. बाजारातील महागडी बाहुली विकत घेणे जमलं नाही तर काठीला चिंध्या लावून बाहूली करून तिच्याशी तासनतास खेळणं, तिचं लग्न लावून देणं. तिला न्हावू माखु घालणं, तिच्याशी गप्पा मारणं असे उद्योग बऱ्याच लहान मुला-मुलीं केले असतील; पण आजही बार्बी हे नाव उच्चारली तरी बाहुलीची प्रतिमा डाेळ्यासमाेर उभी राहते. आज ९ मार्च. बार्बी बाहुलीचा बर्थ डे. पाहूया बार्बीच्या जन्माचा इतिहास.
आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १९५९ रोजी बार्बी बाहुली पहिल्यादा विक्रीसाठी बाजारात आली; पण तुम्हाला हे माहित का, बार्बी ही बाहुली एका आईने आपल्या लेकीसाठी तयार केलेलं एक खेळणं होतं. त्याचं असं झालं की, अमेरीकेत जन्मलेली बार्बरा लहानपणी कागदापासून बनवलेल्या बाहूलीशी तासनतास खेळायची.हे तिची आई रुथ हँडलर पाहायची; मग तिने ठरवले आपल्या लेकीसाठी आपण बाहुली बनवायची.
१९५६ च्या दरम्यान रुथ आपली मुले बार्बरा आणि केनेथ यांच्याबरोबर जर्मनीमध्ये गेली होती. तिथे तिने बार्बराला बिल्ड लिली ही बाहुली घेतली. या बाहुलीसारखीचं आपल्या लेकीसाठी थ्री डायमेंशनल बाहुली बनविण्याचे ठरविले. आणि एका नव्या बाहुलीचा जन्म झाला. आज याचं सोनेरी केसाच्या, निळ्या डोळ्यांच्या, बांदेसुद बाहुलीला बाजारात प्रचंड मागणी आहे. एका गरजेतून, मायेपोटी तयार केलेली ही बाहुली आज चर्चेचा आणि बातम्यांचा विषय झाली आहे. काहीवेळा तिचा वर्ण, बांधा यावरुन टीकाही केली जाते.
१९६० साली बार्बीच्या (Barbie Doll)काल्पनिक जीवनावर रँडम हाऊस प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलं. यामध्ये तिच्या कुटुंबाचा उल्लेख आहे. बार्बीनंतर तिचा भाऊ केनेथ (केन) हा बाहुल्यांच्या रुपात जगासमोर आला. बार्बी आणि केनची जोडी खूप चर्चेत आली. त्यानंतर बार्बीची स्कीपर, टॉड व टूटी (जुळी भावंडे), स्टेसी, केली, चेल्सी आणि क्रिसी ही सात भावंडेही आले बाहुल्यांच्या रुपात.
बार्बी आज ६३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. बार्बीला आपण वेगवेगळ्या प्रकारात पाहिलं आहे. राष्ट्रपती ते विमानचालकापर्यंत तिला आपण पाहिलं आहे. तब्बल १९० हून अधिक रुपात तिला आपण पाहिल आहे. माॅड बार्बी, प्लॅटिनम बार्बी, सुपरसाइज बार्बी एक ना अनेक बार्बीज आल्या पण केसंवाली टाेटली बार्बीला अधिक मागणी. आज तिच्या किंमती हजारोंच्या घरात आहेत.
पाहा व्हिडिओ : "महिलांनी राजकारणात आलं पाहिजे" – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women's Day 2022