Latest

Govt New Rules For Chinese : चिनी कंपन्यांना सरकारचा नवा आदेश; भारतात व्यवसाय करायचा, तर…

अमृता चौगुले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चिनी कंपन्यांवरील निर्बंध आणखी कडक करताना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर भारतीय भागीदार नेमणे या कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. (Govt New Rules For Chinese)

भारतात चिनी स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. शाओमी, ओप्पो, कुलपॅड, वनप्लससारख्या मोबाईल फोन कंपन्या भारतात प्रचंड व्यवसाय करतात व एकट्याने नफा कमावतात; पण इथून पुढे हे बंद होणार आहे. चिनी मोबाईल कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावेच लागतील, असा नियम सरकारने जारी केला आहे. (Govt New Rules For Chinese)

भारतीय भागीदाराशिवाय या कंपन्या भारतात उत्पादनही करू शकणार नाहीत. चिनी कंपन्यांना आपला मोबाईल फोन किंवा इतर उत्पादने भारतात बनवायची आणि विकायची असतील, तर सरकारच्या अटींचे पालन करावेच लागेल. (Govt New Rules For Chinese)

भारतातील बॉसही भारतीयच हवा!

चिनी कंपन्यांचे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य तांत्रिक अधिकारीही भारतीयच असावेत, अशी अटही सरकारने घातली आहे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT