Women emerging Asia cup : श्रेयंका पाटीलचा पंच; दोन धावांत निम्मा संघ गारद

Women emerging Asia cup : श्रेयंका पाटीलचा पंच; दोन धावांत निम्मा संघ गारद

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची युवा खेळाडू श्रेयंका पाटीलने हॉंगकॉंगविरुद्धच्या Women emerging Asia cup चषकाच्या सलामीच्या सामन्यात कडक गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीलने दोन धावांत पाच विकेट्स घेत २३ वर्षांखालील महिला संघाने Women emerging Asia cup स्पर्धेत हाँगकाँग संघावर नऊ गडी राखून विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या श्रेयंकाने हाँगकाँग संघाचा डाव १४ षटकांत अवघ्या ३४ धावांवर गारद केला.

हाँगकाँगसाठी सलामीवीर मारिको हिलने १९ चेंडूत १४ धावा केल्या. अंडर-१९ विश्वचषकात भारताची खेळाडू मन्नत कश्यप (२/२) आणि लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा (२/१२) यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात जी त्रिशाच्या नाबाद १९ धावांच्या खेळीमुळे भारताने ५.२ षटकांत ३८ धावा करून लक्ष्य गाठले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news