पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदापूर येथे काल ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्यानंतर भाजप नेते गाेपीचंद पडळकर यांच्या त्यांच्या दिशेने शनिवारी (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जात असताना हा प्रकार घडला आहे. यानंतर भाजप नेते छगन भुजबळ यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, " आम्ही जशास तसे उत्तर देऊ!" जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Gopichand Padalkar)
ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात शनिवारी (दि.९) ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर व त्यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर पडळकर इंदापुरातील एका आंदोलन स्थळी भेट देण्यास गेले होते. शेजारीच मराठा बांधवाकडून साखळी उपोषण सुरू होते. त्याचदरम्यान मराठा बांधवाकडून त्यांना जाब विचारत घोषणाबाजी सुरु झाली आणि त्यांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली.
ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट करत पडळकरांवर झालेल्या चप्पलफेकीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! आज विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!"
हेही वाचा