Latest

दिलासादायक! दिल्लीनंतर आता मुंबईतही ‘झिरो’ कोव्‍हिड, एकाही रुग्णाची नोंद नाही

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईतही मंगळवारी (दि.२४) कोरोनाच्या एकाही रूग्णाची नोंद झालेली नाही. मार्च २०२० पासून  कोरोनाची सुरूवात झाल्यापासून प्रथमच मुंबईत काल 'झिरो' कोव्‍हिड रूग्णांची नोंद झाली आहे. काल मुंबई शहरात ३ हजार व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात एकाही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. १६ मार्च, २०२० पासून पहिल्यांदाच मुंबई शहरात कोरोनाची ही दिलासादायक स्थिती आढळून आली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, देशातील अनेक शहरात कोरोना रूग्णांमध्ये घट होत असताना दिसत आहे. तर काही शहरात कोरोना रूग्णांचे प्रमाण किंचितसे वाढले आहे. यापूर्वी १६ जानेवारीला दिल्लीतही झिरो' कोव्‍हिडची नोंद करण्यात आली होती. यावेळी दिल्‍लीत कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा ०.०० टक्के पाहायला मिळाला होता. जगातील विविध देशांमध्‍ये कोराना रुग्‍णसंख्‍या वाढत असल्‍याचे चित्र असताना भारतात दिल्‍ली पाठोपाठ मुंबईतही 'झिरो' कोव्‍हिडमुळे संपूर्ण देशाला दिलासादायक स्थिती पाहायला मिळाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत मुंबई शहर कोरोनाच्या सगळ्यात हिट लिस्टमध्ये होते. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोविस तासात कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. मुबईत आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार, २४० कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच १९ हजार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

'झिरो' कोव्‍हिडच्या स्थितीवर बोलताना बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे म्हणाल्या, "गेल्या काही वर्षांत आपण जे काही अनुभवले आहे त्या सर्व गोष्टींनंतरचा आनंद आणि समाधान व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. गेल्या महिनाभरात, आम्ही सिंगल डिजिटमध्येच कोरोनाची प्रकरणे नोंदवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या महिन्यात २४ जानेवारीपर्यंत शहरात कोरोनाची ११६ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर महानगरपालिकेने सतर्कतेने पाऊले उचलण्यास आणि खबरदारीचा उपाय म्हणून जीनोम सिक्वेन्सिंग प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे येथिल एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT