Latest

Gold Rate in 2022 : नवीन वर्षात सोने चमकणार, काय असेल दर!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Rate in 2022 : २०२१ वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत दर खाली आल्याने सोन्याची झळाळी कमी झाली होती. पण कोरोना- ओमायक्रॉन महामारीचे संकट, महागाईची चिंता आणि अमेरिकन डॉलर मजबूत होऊन नवीन वर्ष २०२२ मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर (प्रति तोळी) ५५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

२०२० मध्ये सोने दरात मोठी तेजी आली होती. दोन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. हा दर उच्चांकी दराच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी तर जानेवारी २०२१ च्या तुलनेत ४ टक्क्यांनी कमी आहे.

कॉमट्रेंड्जचे Co-Founder आणि सीईओ गणासेखर त्यागराजन यांनी म्हटले आहे, की सोन्याचे दर कमी राहण्याचे मुख्य कारण म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये अतिरिक्त तरलता (rush of liquidity) असणे आहे. दरम्यान, ओमायक्रॉनमुळे अनेक युरोपीय देशांमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्यांवर COVID निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकी नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा तसेच मास्कचा वापर करावा आणि हिंवाळ्यातील सुट्टीदरम्यान प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

त्यांच्या मते युरो आणि येन सारख्या चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तसेच महागाईची चिंता आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

२९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा (Spot gold) दर प्रति औंस १,७९१ डॉलर एवढा होता. तर भारतात एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम ४७,७४० रुपये एवढे होते.

त्यागराजन यांनी पुढे म्हटले आहे की २०२२ च्या (Gold Rate in 2022) पहिल्या सहामाहीत सोन्याचा दर प्रति औंस १७००-१९०० डॉलर दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या सहामाहीत दर २ हजार डॉलरवर जाऊ शकतो. देशातर्गंत बाजारात सोन्याचे दर ४५ हजार ते ५५ हजार रुपये दरम्यान राहू शकतात. तसेच दुसऱ्या सहामाहीत दर ५५ हजारांवर जाऊ शकतो. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

Gold Price Today : वर्षाच्या अखेरच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी

वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर सोन्याच्या दरात तेजी कायम राहिली. शुक्रवारी शुद्ध सोने (२४ कॅरेट) ४८ हजारांवर पोहोचले. गुरुवारच्या तुलनेत सोने शुक्रवारी २८० रुपयांनी ४८,०७८ (प्रति १० ग्रॅम) रुपयांवर गेले. तर चांदी महाग होऊन प्रति किलो ६१,८९६ रुपयांवर आहे. २३ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४७,८८५ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,०३९ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ३६,०५९ रुपये आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT