Latest

Gold Price Today : दिवाळीआधी सोने खरेदीचा मुहूर्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

दीपक दि. भांदिगरे

सराफा बाजारात आज गुरुवारी (दि.२८) सोने दर (Gold Price Today) ४८ हजारांवर गेला. काल बुधवारी शुद्ध सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ४७,९०३ रुपयांवर होता. त्यात आज वाढ दिसून आली. गुरुपुष्यामृत योग हा प्रमुख महत्त्वाचा योग आहे. या मुहूर्तावर सोन्याची सर्वाधिक खरेदी होते. सुवर्ण धातू हा राजधातू मानला जातो. त्यामुळे मागणी वाढल्याने सोन्याची वाटचाल तेजीच्या दिशेने सुरु आहे.

सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) १६२ रुपयांनी वाढून ४८,०६५ रुपयांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचला. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ४७,८७३ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,०२८ रुपये, १८ कॅरेट ३६,०४९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २८,११८ रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६४,६९९ रुपये होता.

डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या दराला झळाळी मिळाली आहे. त्यात सणासुदीत मागणी वाढली आहे. यामुळे सोने तेजीत आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सोन्याच्या दरात येत्या काही दिवसांत तेजी राहील, असे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवाळीपर्यंत सोने ५० हजारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : धारावीतील कुंभारवाड्यात कश्या तयार केल्या जातात पणत्या? | Deewali lamp | Deewali special

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT