Latest

Goa Election 2022 : पंतप्रधानांनी दिल्‍या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शुभेच्छा

अमृता चौगुले

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोव्यात (#GoaElections2022) आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‌ सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवडणुकीत यश‌ मिळण्यासाठी दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की गेल्या १० वर्षात भाजप सरकारने राज्याचा चौफेर विकास केल्यामुळे या निवडणुकीत भाजपला २२ हून अधिक जागा मिळतील. आत्मनिर्भर भारत योजनेला स्वयंपूर्ण गोव्याची जोड दिली आहे. भाजप स्वबळावर निवडणुकीनंतर सरकार स्थापन करेल. ‌भाजपला बहुमत मिळणार आहे.असा माला विश्वास आहे. तसेच पंतप्रधानांच्या शुभेच्छांमुळे आनचखीन हुरुप वाढला आहे.

गोव्यातील आज 301 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. गेल्या महिनाभरात प्रत्येक उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न केलेत. आता मतदारराजा कोणावर प्रसन्न होणार, हे आपल्याला 10 मार्चच्या निकालादिवशीच समजून येईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी 2 तासांनी वाढला असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे. तत्पूर्वी पहाटे म्हणजे सकाळी 5.30 वा. मतदानाची रंगीत तालीम (मॉक पोल) निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच इतर मतदारांसाठी रॅम्प, पाणी, वीज, शौचालय अशी सर्व व्यवस्था करण्यात आली असून कडक उन्हात लोकांना उभे राहावे लागू नये म्हणून अनेक मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन ते तीन पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले असून भरारी पथके, सर्वसाधारण तसेच खर्च निरीक्षक एकंदरीत मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT