Latest

महाराष्ट्रात टोळीचं राज्य; आरएसएसनं काळजी घ्यावी : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुसऱ्याचे नेते, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचं काम सुरू आहे. स्वत:मध्ये काही करण्याची धमक नसल्याने दुसऱ्याचे चोरायच आणि आपले म्हणून मिळवायचं, महाराष्ट्रात जणू टोळीच राज्य आले आहे की काय, अशी भावना जनसामान्यांत आहे. काल मुंबई महापालिकेत मिंधे गट ताबा सांगायला गेला होता. आज आरएसएस कार्यालयात ताबा सांगायला गेले होते का? आरएसएस मजबूत आहे, त्याचा ताबा घेऊ शकणार नाहीत. पण यापुढे आरएसएसने काळजी घेतली पाहिजे, असा टोला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भागवतांनी कार्यालयात लिंबू टाकले का पाहवं?

मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावरून बुधवारी झालेल्या ठाकरे-शिंदे गटाच्या राड्यानंतर आज शिवसेनेसह महापालिका मुख्यालयातील सर्व पक्षांची कार्यालय सील करण्यात आली. यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटावर निशाणा साधला. काल मुंबई महापालिकेत मिंधे गट गेला होता, आज आरआरएस कार्यालयात गेला. तेथे आज ताबा सांगयला गेला होता का, याचं उत्तर मिळालेलं नाही. पण भागवत यांनी कोपऱ्यांत कुठे लिंबू टाचण्या पडल्यात का ते तपासून घ्यावे. नजर खूप वाईट आहे, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते ते उघड उघड चोरी करतात किंवा ताबा घेतात. चांगले काही करू शकत नाही तेव्हा ते मिळवण्यासाठी कब्जा कसा करायचा ही त्यांची घाणेरडी वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसने काळजी घेतली पाहीजे, असा टोला ठाकरेंनी लगावला.

घोटाळ्यांबाबत सरकार काय करणार?

नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. विदर्भासाठी आतापर्यंत सरकारने काहीही घोषणा केली नाही. ५२ हजार कोटी रूपयांच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. पण कोणासाठी आणि कोणत्या पद्धतीने वापरणार याची सांगड घालण्यात आलेली नाही. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. घोटाळ्यांबाबत सरकार काय करणार आहे? ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांना क्लिनचीट द्यायची आणि ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हे सरकारचे धोरण आहे का? हे सरकारने जाहीर करावे. आरोपातील गांभीर्य पाहता मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहीजेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT