मुख्यमंत्री म्हणाले, लहानपणी मी संघाच्या शाखेत जायचो! रेशीमबाग, दीक्षाभूमीला दिली भेट | पुढारी

मुख्यमंत्री म्हणाले, लहानपणी मी संघाच्या शाखेत जायचो! रेशीमबाग, दीक्षाभूमीला दिली भेट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती परिसर एक प्रेरणास्थान आहे. येथे नतमस्तक व्हायला मी आलो आहे. येथे आल्याचे समाधान आहे. लहानपणी मी संघाच्या शाखेत जायचो. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत अनेकांना धक्का दिला. नागपुरातील हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना गुरुवारी रेशीमबाग येथील स्मृती भवन परिसराला भेट दिल्यावर ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके यांच्यासह संघाचे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. बालपणी आपण संघाच्या शाखेत जात होतो, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केले. प्रारंभी संघाचे पदाधिकारी विकास तेलंग यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा :

Back to top button