Latest

तहसीलदार मारहाण प्रकरण : माजी कृषीमंत्री डॉ. बोंडेंना तीन महिन्यांची शिक्षा

अनुराधा कोरवी

अमरावती; पुढारी वृत्तसेवा: तहसीलदारास त्यांच्याच कार्यालयात मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधिश क्रमांक १ एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने ही शिक्षा मंगळवार( दि. ५ एप्रिल) रोजी ठोठावली. सहा वर्षांपूर्वी हा  प्रकार घडला हाेता.

वरूड तहसील कार्यालयात तक्रारकर्ते नंदकिशोर वासुदेवराव काळे हे संगायोचे नायब तहसीलदार होते. वरूड तहसील कार्यालयात ३० सप्टेंबर २०१६ रोजी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी नंदकिशोर काळे यांना तहसीलदार यांच्या कार्यालयात दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान बोलाविले.

यावेळी डॉ. बोंडे यांनी 'कारे हरामखोरा तू माझ्या लोकांच्या प्राप्त अर्जापैकी २४० प्रकरणे त्रृटीत का काढलेस?. तुला या कार्यालयात नियुक्ती कोणी दिली?. तुला जिवंत राहायचे नाही का?, माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही तर जिवंत राहू देणार नाही, असे म्हणून हजर असलेले कर्मचारी तलाठी बनसरे, नायब तहसीलदार सहारे यांच्या समक्ष त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील शासन निर्णयाची प्रत व शासकीय कागदपत्र फाडून टाकली होती.

जीवे मारण्याची धमकी

इतकेच नव्हे तर नंदकिशोर वासुदेवराव काळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात व्यत्यय आणला. या तक्रारीवरून अंमलदार वरूडचे सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲड. मिलिंद शरद जोशी यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. अभियोग पक्षाने तपासलेल्या साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी डॉ. अनिल बोंडे यांना कलम ३३२, ५०४ अन्वये दोषी मानले. या कलमानुसार तीन महिन्यांची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी राजेंद्र बायस्कर व एनपीसी अरुण हटवार यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT