पिंपरी : भटक्या कुत्र्यांना बिस्किटे टाका

पिंपरी : भटक्या कुत्र्यांना बिस्किटे टाका
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो त्यांचा बंदोबस्त करा, अशी तक्रार केली तर अधिकारी सांगतात त्यांना बिस्किट टाका, त्यांच्याशी मैत्री करा म्हणजे अंगावर धावून येणार नाहीत, असा सल्ला दिल्याची तक्रार ब प्रभागातील जनसंवाद सभेत आलेल्या एका नागरिकांनी केली.

महापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागामध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्यात येते. चिंचवड स्टेशन येथील ब प्रभाग येथे प्रेमलोक पार्क येथील रहिवाशाने भटक्या कुर्त्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार केली आहे. या वेळी ब क्षेत्रिय अधिकारी अभिजित हराळे उपस्थित होते.

अधिकारी असे उत्तर देत असतील तर महापालिकेने कुत्र्यांसाठी बिस्किटे पुरवावीत, अशी मागणी नागरिकांनी हराळे यांच्याकडे केली. सभेमध्ये नागरिकांनी एकामागे एक तक्रारींचा पाढा वाचला.

दळवीनगर येथील जवळपास 15 ते 20 महिलांनी गेली आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने ब प्रभागामध्ये मोर्चा आणला होता. या वेळी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकर पुरवावेत, अशी मागणी केली.

याचबरोबर काळेवाडी विजयनगर याठिकाणी पाणी समस्या, रस्ते दुरुस्ती, चेंबर तुबंणे, रस्त्यावरील दिवे दुरूस्ती, झाडांची छाटणी वेळेवर करावी, अशा तक्रारी होत्या.

चिंचवड चापेकर चौकात बस स्थानकाची सोय करण्याची मागणी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय होत आहे.

त्यासोबतच निकृष्ट दर्जाच्या सिमेंट व काँक्रीटचे रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यानातील खेळणी व ओपन जीमची दुरावस्था आदी तक्रारी दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news