Latest

ford figo च्या दोन ऑटोमेटिक गाड्या बाजारात; जाणून घ्या किंमत

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : ग्राहकांशी नाते अधिक द़ृढ करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून फोर्ड इंडियाने त्यांच्या फ्लॅगशिप हॅचबॅग ford figo कारचे नवीन दोन ऑटोमेटिक व्हेरियंटस् बाजारपेठेत सादर केले आहेत. ford figo टायटॅनियम आणि टायटॅनियम प्लस यांना अनुक्रमे ७.७५ लाख रुपये आणि ८.२० लाख रुपये अशा किमतींमध्ये सादर करण्यात आले आहे.

नवीन फोर्ड फिगो ऑटोमेटिक (एटी) ची ही नवीन व्हेरियंटस् अगदी पैसे वसूल करणारी आहे.

त्यांनी बाजारपेठेतील या सेगमेंटमध्ये अग्रस्थान कायम राखले आहे.

ही कार उच्चप्रतीच्या संरक्षण वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यास सहा एअरबॅग्ज आहेत.

ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (टीसीएस), हिल लाँच असिस्ट (एचएलए), फोर्ड पासद्वारे रिमोटद्वारे र्स्टाटिंग, लॉकिंग, अनलॉकिंग, स्टॉपिंग करता येईल.

1.2 लिटर टीआयव्हीसीटी पेट्रोल इंजिन, रेन सेन्सिंग वायपर्स, इन्फोटेन्मेंटसाठी 7 इंच टचस्क्रीन, साईड आणि कर्टन एअरबॅग्ज, स्टँडर्ड ड्युअल फ्रंट एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल अशी वैशिष्ट्ये यात आहेत.

सिक्स स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनवर नवीन स्पोर्ट मोड आणि सिलेक्ट शिफ्ट ही फिचर्सही आहेत.

डायमंड व्हाईट, रूबी रेड, मूनडस्ट सिल्व्हर, स्मोक ग्रे आणि व्हाईट गोल्ड या पाच रंगांत या कार उपलब्ध आहेत.

आठवड्यातील सहा दिवस सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत ऑनलाईन बुकिंगची सोय उपलब्ध आहे.

डायल ए फोर्ड हा न्यू बुकिंग पोर्टलचा विस्तारित उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.

हे ही पाहा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT