पुढारी ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यासाठी आजचा दिवस खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे. बहुचर्चित चारा घोटाळ्यातील
( Fodder scam ) आणखी एका प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालय आज लालूप्रसाद यादव यांच्यासह ३८ आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. दोरंदा कोषागारमधून १३९.५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. १५ नोव्हेंबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दोषी ठरवले होते.
चारा घोटाळा प्रकरणातील पाचव्या खटल्यातील दोषींना आज व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिक्षा सुनावली जाणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासह ४१ जणांना दोषी ठरवले होते. तसेच शिक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुनावली जाईल, असेही स्पष्ट केले होते. याप्रकरणातील ३८ आरोपींपैकी ३५ जण बिरसा मुंडा कारागृहात आहेत. तर लालू प्रसाद यावद, डॉ. के. एम. प्रसाद आणि यशवंत सहाय हे आरोग्याच्या कारणास्तव राजेंद आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (रिम्स) उपचार घेत आहेत. तर तिघे फरार आहेत.
आज व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व दोषींना न्यायालयासमोर हजर केले जाइर्ल. यासाठी लॅपटॉपची व्यवस्था केली आहे. न्यायालयीन सुनावणी १२ वाजता सुरु होणार आहे.
चारा घोटाळा प्रकरणी २००१ मध्ये १७० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाले. खटल्याची सुनावणी सुरु असताना ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर सात जण माफीचे साक्षीदार झाले होते. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये आरोप
निश्चित केले होते. चारा घोटाळा प्रकरणातील अन्य चार खटल्यांमध्ये लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :