Latest

नांदेड जवळील भीषण अपघात पाच ठार तर चार जखमी

backup backup

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा ते करंजी दरम्यान आयशर व ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि.२४) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून मृत आणि जखमींमध्ये बहुतांश बिहारचे मजूर आहेत.

नांदेडहून चंद्रपूर जिल्हयातील गडचांदुर येथे सिमेंट भरण्यासाठी जात असलेला ट्रक व इस्लापूर वरून माल भरून भोकरकडे जाणाऱ्या आयशरची धडक झाली. अपघातात ट्रक चालक आणि आयशर मधील बिहारच्या आठ मजुरांपैकी चार जण जागीच ठार झाले. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT