Latest

Video : दैव बलवत्तर! भायखळ्यात लाकडाच्या वखारीला आग, १५० विद्यार्थिनी वाचल्या!

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दैव बलवत्तर असल्याने भायखळ्यातील ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूलमधील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या तब्बल १५० विद्यार्थिनींचे प्राण वाचले आहेत. शाळेच्या प्रांगणात असलेल्या लाकडी गोदामाला सोमवारी पहाटे ५.३० वाजण्यास सुमारास भीषण आग लागली. या आगीची तीव्रता इतकी अधिक होती की शाळेचे तीन मजले अग्नीच्या कचाट्यात सापडले. हीच आग दोन तास उशिराने लागली असती, तर होत्याचे नव्हते झाले असते.

सकाळी सात वाजता दहावीचे तास भरणार होते. यावेळी दहावी इयत्तेमधील १५० विद्यार्थिनी अध्यापनासाठी येणार होत्या. मात्र दीड तास आधीच आग लागल्याने पुढील भीषण परिस्थिती टळल्याचे शाळेतील व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

या आगीमुळे शालेय विद्यार्थिनींच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली. शाळा भरल्यानंतर आग लागली असती तर चेंगराचेंगरीची भीतीही व्यवस्थापकांनी वर्तवली. शाळेच्या प्रांगणात पोहचलेल्या या गोदामांवर मुंबई महापालिका आणि राज्य शासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ :

SCROLL FOR NEXT