Latest

अखेर फरहान अख्तर- शिबानी दांडेकरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर याच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच दरम्यान फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. दोघांनी अद्याप लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, सध्या फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी लग्नाची तारीख ठरली असल्याचा खुलासा केला आहे. यासोबतच जावेद यांनी लग्नाच्या संपुर्ण तयारी झाल्याचेदेखील सांगितले आहे.

जावेद अख्तर यांनी फरहान आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी हे येत्या २१ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या विवाहसोहळा खंडाळा येथील घरी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे लग्न कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे अगदी साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. या विवाहसोहळ्यात मोजकेच नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. तसेच लग्नपत्रिका अद्याप कुणालाही पाठवली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

नुकत्याच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी शिबानी खूप चांगली मुलगी असून ती फरहानचा संसार चांगला करेल असे म्हटले आहे. तसेच त्यांनी वेडिंग प्लानर लग्नाची तयारी हाताळत असल्याचे देखील सांगितले आहे.

फरहान अख्तरचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी हेअरस्टायलिस्ट अभुना भबानी अख्तरसोबत लग्न केले होते, मात्र, दोघेजण २०१७ मध्ये विभक्त झाले आणि त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. फरहान आणि अभुना या दोघांना शाक्य आणि अकीरा नावाची दोन मुली आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, फरहान अख्तर शेवटचा 'तूफान' चित्रपटात दिसला. या चित्रपटात फरहानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरने काम केले आहे. राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाला चाहत्याकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सध्या फरहानचा आगामी 'जी ले जरा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात फरहानसोबत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट सारखे स्टार्स दिसणार आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT