पुणे : घरात घुसून बलात्काराची धमकी देणार्‍या तरूणाला बेड्या

पुणे : घरात घुसून बलात्काराची धमकी देणार्‍या तरूणाला बेड्या
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एचआर मॅनेजर महिलेला अश्लिल मेसेज पाठवून, घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी देणार्‍या तरूणाला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोविंद बेहरे (रा. फ्लॅट न1, शांतीनगर, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील एका कार्यालयात फिर्यादी महिला एचआर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्या कार्यालयातच बेहरे हा कामास होता. त्याची कार्यालयातील महिला सहकार्‍यांशी असणारी वागणूक योग्य नव्हती. तसेच त्याने कार्यालयातील एका महिलेलाही अपमानस्पद वागणूक दिली होती. या कारणावरून महिला फिर्यादीने बेहरे यास कामावरून काढून टाकले. याचा राग मनात धरून, बेहरेने त्यांना अश्लिल मसेज पाठवत, शिवीगाळ केली.

त्यांनी ही बाब आपली वकील बहीण आणि मेव्हण्यांना कळवली. त्यानंतर फिर्यादीच्या वकील बहिणीने बेहरे याला जाब विचारला असता, त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच फिर्याद देणाऱ्या बहिणीवर दोन दिवसांत घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी दिली.
यानंतरही त्याने आपल्या बोटाची नस कापून त्याचा फोटो व्हॉटस अ‍ॅपला पाठवत अर्वाच्च शिवीगाळ करून अत्यंत घाणेरडे मेसेज पाठवले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी बेहरे याच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी झिरो नंबरने ही तक्रार दाखल करून ती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे पाठवली. यानंतर बेहरेला तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news